सलमान खानमुळे या अभिनेत्रींमधील झाले मतभेद दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 08:14 AM2017-10-28T08:14:55+5:302017-10-28T13:44:55+5:30

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानमुळे दोन अभिनेत्रींमधील मतभेद नुकतेच दूर झाले आहेत. बॉलिवूडमध्ये नायकांमध्ये अनेक वेळा मैत्री पाहायला मिळते. ...

The differences between Salman Khan and the actress were far away | सलमान खानमुळे या अभिनेत्रींमधील झाले मतभेद दूर

सलमान खानमुळे या अभिनेत्रींमधील झाले मतभेद दूर

googlenewsNext
लिवूडचा दबंग खान सलमान खानमुळे दोन अभिनेत्रींमधील मतभेद नुकतेच दूर झाले आहेत. बॉलिवूडमध्ये नायकांमध्ये अनेक वेळा मैत्री पाहायला मिळते. पण दोन नायिका एकमेकींच्या चांगल्या फ्रेंड्स नसतात असे म्हटले जात. या गोष्टीला काही अभिनेत्री अपवाद असल्या तरी अनेक अभिनेत्रींचे एकमेकांसोबत अजिबातच पटत नाही. सलमान खानला नुकताच असाच एक अनुभव आला. या या दोन्ही अभिनेत्री या त्याच्या लाडक्या मैत्रिणी असून त्या दोघीही एकमेकांशी अजिबताच बोलत नसल्याचे सलमानच्या लक्षात आले. त्याच्या दोन मैत्रिणींनी एकमेकींकडे दुर्लक्ष करणे त्याला आवडले नसल्याने सलमानने त्यांच्यात मध्यस्थी करून त्यांचे मतभेद दूर केले. सलमानमुळे आता या दोन्ही अभिनेत्री एकमकेांशी चांगल्या पद्धतीने बोलायला लागल्या आहेत. 

sonakshi sinha jacqueline fernandez

सलमान खान नुकताच दबंग टूर वर गेला होता. या टूरमध्ये अनेक अभिनेत्रींनी सलमानसोबत परफॉर्मन्स सादर केला. सलमानची ही टूर चांगलीच गाजली होती. याच टूरच्या वेळी त्याच्या दोन नायिका एकमेकांशी बोलत नसल्याचे सलमान खानच्या लक्षात आले. या दोन्ही अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा आणि जॅकलिन फर्नांडिस आहेत. सोनाक्षी आणि जॅकलिन या दोघी सलमानच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. सोनाक्षी सिन्हाला तर सलमाननेच दबंग या त्याच्या चित्रपटाद्वारे लाँच केले आहे तर जॅकलिन सलमानसोबत किक या चित्रपटात झळकली होती. सलमानच्या घरी असलेल्या कार्यक्रमांमध्ये देखील सोनाक्षी आणि जॅकलिन आवर्जून उपस्थिती लावतात. ऑस्ट्रेलियाला दंबग टूरवर असताना सोनाक्षी आणि जॅकलिन एकमेकांसोबत थोडे देखील बोलत नसल्याचे सलमानच्या लक्षात आले. त्या दोघांना एकमेकांसोबत राहाणे पसंत नसल्याचे त्यांच्या वागणुकीतून दिसत होते. त्यांच्यात खूप सारे मतभेद आहे हे सलमानच्या लक्षात आल्यावर सलमानने या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांना एकमेकींसोबत काय प्रोब्लेम आहे हे विचारून घेतले आणि त्यांच्यात असलेले सगळे मतभेद दूर केले. सलमानने मध्यस्थी केल्यावर मतभेद विसरण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच पर्यायच नव्हता. या नंतर त्या एकमेकींशी आता खूप चांगल्या प्रकारे बोलायला लागल्या आहेत. 

Also Read : ​सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा तो फोटा बहिण अर्पिताने केला शेअर

Web Title: The differences between Salman Khan and the actress were far away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.