कोरोनाची दहशत : आयसोलेशनमध्ये आहेत 97 वर्षांचे दिलीप कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:19 AM2020-03-17T10:19:43+5:302020-03-17T10:21:02+5:30
पत्नी सायरा बानो घेत आहेत काळजी...
कोरोनाच्या प्रकोपामुळे जणू संपूर्ण जग थांबले आहे. सगळीकडे भीती आणि दहशतीचे वातावरण असताना बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना कोरोनापासून बचावासाठी आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी रात्री त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पत्नी सायरा बानो माझी पूर्ण काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘कोरोना व्हायरसमुळे मी पूर्णपणे आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये आहे. मला कुठल्याही प्रकारचे इंफेक्शन होऊ नये, याची काळजी सायरा घेतेय,’असे दिलीप कुमार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
I am under complete isolation and quarantine due to the #CoronavirusOutbreak. Saira has left nothing to chance, ensuring I do not catch any infection.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) March 16, 2020
कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरू नये, म्हणून संबंधित व्यक्तिला क्वारंटाईन वा आयसोलेशनमध्ये ठवेले जाते. म्हणजेच, हवेशीर बंद खोलीत वेगळे ठेवले जाते. दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण झालेली नाही. पण त्यांची नाजूक प्रकृती बघता, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आयसोलेशन व क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
I appeal to all of you to protect yourself and others by staying indoors as much as possible.
— Dilip Kumar (@TheDilipKumar) March 16, 2020
The #CoronavirusOutbreak transcends all boundaries and borders.
Follow guidelines issued by health departments, protect yourself and others by limiting your exposure to others.
97 वर्षांचे दिलीप कुमार दीर्घकाळापासून आजारी आहेत. यादरम्यान त्यांना अनेकदा रूग्णालयात भरती करण्यात आले. अगदी अलीकडे त्यांच्या कंबरेचे दुखणे बळावले होते. यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रूग्णालयात नेण्यात आले होते. यानंतर त्यांच्या कमरेचे दुखणे बरेच कमी झाले आहे. सायरा बानो यांनी एका व्हॉईस मॅसेजद्वारे ही माहिती दिली होती.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे शूटींग रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटांच्या रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.