Dilip Kumar Health Update: दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा खालावली, ICUमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 01:23 PM2021-06-30T13:23:33+5:302021-06-30T13:26:51+5:30

Dilip Kumar Health Update: काल मंगळवारी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

dilip kumar health update veteran actor admitted to hinduja hospital due to breathing issues | Dilip Kumar Health Update: दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा खालावली, ICUमध्ये दाखल

Dilip Kumar Health Update: दिलीप कुमार यांची प्रकृती पुन्हा खालावली, ICUमध्ये दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देदिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते  दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्याआयसीयूमध्ये  त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे. 
काल मंगळवारी दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडली.  त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांच्या शरिरातील हिमोग्लोबीनची मात्रा कमी झाली आहे. मात्र तूर्तास चिंतेचे कारण नाही. (Dilip Kumar Health Update)

याच महिन्यात गेल्या 6 जूनला श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणावरून दिलीप कुमार यांना हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. फुफ्फुसात पाणी भरल्याच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुमारे दहा दिवसांच्या उपचारानंतर, जेव्हा त्यांना आराम वाटू लागला, तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आलं होतं.
 दिलीप कुमार 98 वर्षांचे आहेत. अनेकवेळा रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत. त्यांच्या तब्येतीबद्दल अभिनेत्री आणि पत्नी सायरा बानो सतत चाहत्यांना अपडेट देत असतात.

दिलीप कुमार व सायरा बानो बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून ओळखलं जातं.  सायरा बानो सावलीसारख्या दिलीप कुमार यांच्यासोबत असतात. त्यांची सेवा करतात.  ‘मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है,’ असे सायरा बानो यावेळी यापूर्वी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
 दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही.  

Web Title: dilip kumar health update veteran actor admitted to hinduja hospital due to breathing issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.