पॅरिस कॉन्सर्टमध्ये चाहत्याने दिलजीतकडे फेकला चक्क मोबाईल, पुढे गायकाने काय केलं पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 12:56 PM2024-09-22T12:56:12+5:302024-09-22T12:56:28+5:30

दिलजीतची 'दिल लुमिनाटी टूर' सध्या जोरात सुरु आहे.

Diljit Dosanjh paris concert fan throws mobile at him watch what singer did | पॅरिस कॉन्सर्टमध्ये चाहत्याने दिलजीतकडे फेकला चक्क मोबाईल, पुढे गायकाने काय केलं पाहा

पॅरिस कॉन्सर्टमध्ये चाहत्याने दिलजीतकडे फेकला चक्क मोबाईल, पुढे गायकाने काय केलं पाहा

गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्याच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकून घेतो. दिलजीत उत्तम गायक तर आहेच मात्र चांगला अभिनेताही आहे. 'गुड न्यूज', 'चमकिला', 'उडता पंजाब' यांसारख्या सिनेमातून त्याने आपलं अभिनय टॅलेंटही दाखवून दिलं. सध्या दिलजीतच्या कॉन्सर्ट जगभरात जोरात सुरु आहेत. त्याचं एक एक तिकीट लाखो रुपयांना विकलं जात आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या पॅरिस कॉन्सर्टमध्ये दिलजीतसोबत काय घडलं बघा.

दिलजीत दोसांझची काही दिवसांपासून 'दिल लुमिनाटी टूर' सुरु आहे.   नुकतंच पॅरिसमध्ये त्याची कॉन्सर्ट पार पडली. लाखो प्रेक्षक त्याला लाईव्ह गाताना बघण्यासाठी आले होते. यावेळी तो स्टेजवर गात असताना एक चाहता त्याचा मोबाईलच दिलजीतच्या दिशेने फेकतो. दिलजीत तो मोबाईल उचलतो आणि म्हणतो, "भाई तुम्ही अशा गोष्टी करु नका. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे."  यानंतर दिलजीत त्याला मोबाईल परत देतो. इतकंच नाही तर त्याचं प्रेम दाखवत तो आपलं जॅकेट काढून चाहत्याच्या दिशेने फेकतो. 

दिलजीतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्याचं चाहत्यांवर किती प्रेम आहे हेच यातून दिसतं. चाहत्यांनी यावर कमेंट करत लिहिले, 'भाई ते जॅकेट तर मोबाइलपेक्षाही महागडं असेल','सच्चा आयकॉन आणि ग्लोबल स्टार' असं म्हणत चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केलाय.

दिलजीतची 'दिल लुमिनाटी टूर' आता भारतात होणार आहे. दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये कॉन्सर्ट पार पडणार आहे. त्याच्या कॉन्सर्टच्या महागड्या तिकीट दराची सध्या खूप चर्चा आहे.

Web Title: Diljit Dosanjh paris concert fan throws mobile at him watch what singer did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.