स्टेजवर येताच दिलजीत दोसांझचा पुणेकरांशी मराठीत संवाद; टाळ्या, शिट्ट्या अन् जल्लोष, VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:03 AM2024-12-03T11:03:37+5:302024-12-03T11:06:07+5:30
पुण्यात दिलजीत दोसांझचा मराठमोळा ठसका पाहायला मिळाला.
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) सध्या त्याच्या 'दिल-ल्यूमिनाटी टूर २०२४' कॉन्सर्टमुळे चर्चेत आहे. भारताच्या विविध शहरांत हे कॉन्सर्ट होत आहेत. नुकतंच दिलजीतचा पुण्यातील कोथरुडमध्ये कॉन्सर्ट झाला. या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्टेजवर येताच दिलजीत दोसांझनंं चाहत्यांशी मराठीत संवाद साधून त्यांचं मन जिंकलं. या पंजाबी गायकानं पुणेकरांशी मराठीत संवाद साधला.
पुण्यात दिलजीत दोसांझचा मराठमोळा ठसका पाहायला मिळाला. 'पुणे कल्चर' नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिलजीत दोसांझचा व्हिडीओ शेअर करण्यात आलेला आहे. दिलजीत मराठीत म्हणतो, “कसे आहात पुणेकर? दिलजीत दोसांझ आला रे आला…मुलगी शिकली प्रगती झाली". त्याच्या तोंडून मराठी ऐकताच शिट्या आणि टाळ्याचा कडकडाट झाला.दितजीतचा हा मराठी अंदाज पाहून त्याचे मराठी चाहते खूश झाले आहेत. दिलजीतचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतं आहे.
दिलजीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'अमर सिंग चमकिला' या चित्रपटात अभिनेत्री परिणीत चोप्रासह झळकला होता. पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर सिनेमा आधारित आहे. यासोबतच तो अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉन यांच्या 'क्रू' चित्रपटातही झळकला होता. या चित्रपटात तो जयसिंग राठौरच्या भूमिकेत दिसला.