‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून का दूर पळतेय डिंपल कपाडिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 06:00 AM2019-04-17T06:00:00+5:302019-04-17T06:00:02+5:30

भाच्याच्या बॉलिवूड डेब्यूसाठी डिंपल कपाडिया प्रचंड खटाटोप करतेय. पण ‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून मात्र दूर पळतेय. आता असे का?

dimple kapadia avoids to be seen together with sunny deol | ‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून का दूर पळतेय डिंपल कपाडिया?

‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून का दूर पळतेय डिंपल कपाडिया?

googlenewsNext
ठळक मुद्देसनी देओल व डिंपल या जोडीने अनेक चित्रपटांत एकत्रकाम केले आहे. या चित्रपटादरम्यान दोघांच्या अफेअरचीही चर्चा झाली.

डिंपल कपाडियाचा भाचा करण कपाडिया लवकरच ‘ब्लँक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. (करण हा डिंपल यांची बहीण सिंपल कपाडिया मुलगा आहे. सिंपलच्या मृत्यूनंतर डिंपल यांनीच करणला सांभाळले. त्यामुळे करण डिंपल यांना अगदी आईसारखे मानतो.) या चित्रपटात सनी देओलही मुख्य भूमिकेत आहे. खरे तर भाच्याच्या बॉलिवूड डेब्यूसाठी डिंपल प्रचंड खटाटोप करतेय. पण ‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटपासून मात्र दूर पळतेय. आता असे का? तर याचे उत्तर तुम्हीही जाणताच.
‘ब्लँक’ चित्रपटाच्या एकाही प्रमोशनल इव्हेंटमध्ये डिंपल दिसली नाही. अलीकडे भाच्याच्या बॉलिवूड लॉन्चच्या आनंदात डिंपलने एक शानदार पार्टी दिली. या पार्टीला संपूर्ण कपाडिया कुटुंब आणि सनी देओल हजर राहिल, असे तिच्या पीआरकडून मीडियाला सांगण्यात आले. पण पार्टी संपायची वेळ आली तरी डिंपल पोहोचली नाही. याचे कारण म्हणजे सनी देओल.



 

होय, चर्चा खरी मानाल तर, डिंपलने भाच्याच्या लॉन्चसाठी सनी देओलची मदत घेतली. पण याचवेळी ती आणि सनी कुठेही, कुठल्याही प्रकारे एका फ्रेममध्ये येऊ नये, याचेही भान ठेवले. भाच्याचे प्रमोशन करताना चुकून आपण एकत्र आलोच तर मीडियात पुन्हा नाही-नाही त्या चर्चांचे पेव फुटेल, ही भीती तिला होती आणि तिची ही भीती अवास्तवही नव्हती. याचमुळे ‘ब्लँक’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये ती कुठेही दिसली नाही. पार्टीला येण्याचा निर्णय ऐनवेळी तिने बदलला तोही याचमुळे.


सनी देओल व डिंपल या जोडीने अनेक चित्रपटांत एकत्रकाम केले आहे. या चित्रपटादरम्यान दोघांच्या अफेअरचीही चर्चा झाली. अमृता सिंगसोबत बिनसल्यानंतर सनीच्या आयुष्यात डिंपल आली. त्याही वेळी निश्चितपणे सनी विवाहित होता. पण तरीदेखील तो डिंपलमध्ये गुंतला. पुढे डिंपल राजेश खन्नापासून विभक्त झाली आणि या काळात सनी व डिंपल यांच्यातील जवळीक प्रचंड वाढली. १९८२ मध्ये राजेश खन्नांपासून विभक्त झाल्यावर डिंपल व सनी दोघेही लिव्ह इन मध्ये राहू लागले होते.  यादरम्यान सनी व डिंपल या दोघांनी गुपचूप लग्न केल्याचीही चर्चा होती. सनी व डिंपल या दोघांनी आपले लव्ह लाईफ बरीच वर्षे लपवून ठेवले. डिम्पल व सनी दोघांपैकी कुणीही त्यांचे नाते जगजाहिर करायला तयार नव्हते. पण सनीची एक्स गर्लफ्रेन्ड अमृता सिंह हिनेच या नात्याला तोंड फोडले. सनी व डिंपल यांच्या रिलेशनबद्दल विचारले गेल्यावर अमृता तिच्या मनातील कटुता लपवू शकली नव्हती. डिंपलजवळ केक आहे आणि ती तो खात आहे. तिच्याकडे गमावण्यासारखे काहीही उरलेले नाही, तिला जे हवे होते, ते तिला मिळालेय, असे अमृता एका मुलाखतीत म्हणाली होती.

Web Title: dimple kapadia avoids to be seen together with sunny deol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.