OMG ! जावई अक्षय कुमार डिंपल कपाडियाना वाटायचा गे म्हणून Twinkleला दिला होता हा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:02 PM2020-06-08T13:02:18+5:302020-06-08T13:13:58+5:30
अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा
अभिनेत्री डिंपल कपाडिया आज आपला 63वा वाढदिवस साजरा करतायेत. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी बॉबी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. डिंपल कपाडिया यांने जवाई अक्षय कुमारसोबत चांगले बॉन्डिग आहे. डिंपल आणि अक्षय कुमार यांच्यातला मजेदार किसा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अक्षय कुमारच्या बाबतीतील मजेशीर गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे त्याची सासू म्हणजे ट्विंकल खन्नाची आई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा आणि त्यांनी त्यांच्या मुलीला सल्लादेखील दिला होता. एका शोमध्ये काही वर्षांपूर्वी ट्विंकल खन्नाने सांगितलं होतं की, तिच्या आईला अक्षय कुमार गे असल्याचे वाटायचे.
ट्विंकल खन्नाला एका पत्रकार मित्रानं सांगितलं होतं की अक्षय गे आहे. डिंपल कपाडियाने मुलीला सल्ला दिला की तू व अक्षय एक वर्ष एकत्र रहा आणि मग पुढे काय करायचं ते ठरवा.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महागडा अभिनेत्याच्या यादीत अक्षय कुमारचे नाव सामील झाले आहे. कारण अक्षयने आपलं मानधन दुप्पट केले असून प्रत्येक चित्रपटासाठी तो तब्बल ५४ कोटी मानधन घेतो. अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब सिनेमा लवकरच OTTवर रिलीज होणार आहे. हॉस्ट स्टारने या सिनेमाचे राईट्स विकत घेतले आहेत.