पैसे वाचवण्यासाठी बिपाशा व डिनो शेअर करायचे 10 रूपयांची थाळी, असे काढले अनेक दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 05:05 PM2020-12-09T17:05:12+5:302020-12-09T17:09:31+5:30
बिपाशा बासू आणि 90 च्या दशकातला सर्वात यशस्वी मॉडेल डिनो मोरियाच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी खूप गाजल्या.
बिपाशा बासू आणि 90 च्या दशकातला सर्वात यशस्वी मॉडेल डिनो मोरियाच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी खूप गाजल्या. दोघांनीही एकत्रच मॉडेलिंग करिअर सुरु केले आणि यानंतर चित्रपटात आले. विक्रम भटच्या ‘राज’ या सिनेमात दोघांची रोमॅन्टिक केमिस्ट्रीही पाहायला मिळाली. असे म्हणतात की, याच सिनेमाच्या सेटवर बिप्स व डिनो एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर पाच वर्षे दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. कालांतराने दोघांमध्ये ब्रेकअप झाले. मात्र आजही डिनो व बिप्स एकमेकांचे चांगले मित्र आहेत.
आता तुम्ही म्हणाल, आम्ही हे आज का सांगतोय. तर आज डिनोचा वाढदिवस. 9 डिसेंबर 1975 रोजी बेंगळुरूमध्ये डिनोचा जन्म झाला होता. डिनोने आपल्या करिअरमध्ये काही हिट सिनेमे दिलेत. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला बराच संघर्ष करावा लागला. स्ट्रगलचा एक किस्सा तर खुद्द बिपाशाने एका मुलाखतीत सांगितला होता.
त्या काळात डिनो व बिप्स पैसे वाचवण्यासाठी काय काय करायचे, याचा अंदाज तुम्हाला हा किस्सा वाचून येईल. डिनो व बिप्स केवळ दोन पैसे वाचावे म्हणून 10 रूपयांची थाळी ऑर्डर करायचे आणि दोघेही अर्धी अर्धी खाऊन दिवस काढायचे.
बिपाशाने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघेही एक जेवणाची थाळी घ्यायचो. 10 रूपयांच्या त्या थाळीत चपाती आणि भात असायचा. एक दिवस डिनो चपाती खायचा आणि मी भात खायची. दुस-या दिवशी मी चपाती खायची आणि तो भात खायचा. असे अनेक दिवस आम्ही काढलेत.
डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली.
‘राज’नंतर डिनो अनेक सिनेमात दिसला. पण हे सर्व चित्रपट एकापाठोपाठ आपटले. चित्रपट चालत नाहीत, म्हटल्यावर डिनो रिअॅलिटी शोकडे वळला. 2010 मध्ये ‘खतरों के खिलाडी’चे विजेतेपदही त्याने पटकावले. पण यानंतर डिनोला चित्रपट मिळणे बंद झाले.
हाताला काम हवे म्हणून डिनोने डीएम जिम नावाने एक फिटनेस सेंटर उघडले होते. यात तत्कालीन युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचीही भागीदारी होती. पण 2016 मध्ये आदित्यसोबत झालेल्या वादानंतर डिनोने हे फिटनेस सेंटर बंद केले.
यानंतर डिनोने त्याच्या कॅफे बिझनेसवर लक्ष केंद्रीत केले.
इतक्या वर्षांत इतका बदलला डिनो मोरिया, पाहा फोटो