नऊ वर्ष माझ्याकडे काम नव्हते,कामासाठी दारोदार भटकलो पण, डिनो मोरियाने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 08:30 PM2021-09-10T20:30:00+5:302021-09-10T20:41:59+5:30
जर त्या भूमिका साकारल्या असत्या तर 'ये क्या बकवास कर रहा है?' 'ये क्या कर रहा है, फ्लॉप अभिनेता म्हणूनच मला बोलले गेले असते.
अभिनेता डिनो मोरिया वेब सीरीज 'द एम्पायर'मुळे चर्चेत आहे.वेबसीरीजमधल्या त्याच्या भूमिकेला चांगलीच पसंती मिळत आहे. 2010 नंतर डिनोने अभिनयातून ब्रेक घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे. गेल्या काही वर्षात त्याला मिळालेल्या ऑफर का नाकारल्या आणि इंडस्ट्रीत स्थान निर्माण करण्यासाठी त्याने किती मेहनत घेतलीय या सगळ्यांविषयी त्याने सांगितले.
2010 मध्ये डिनोने 'प्यार इम्पॉसिबल' सिनेमात काम केले होते. या सिनेमानंतर, त्याने सात वर्षांनंतर 'सोलो' या मल्याळम सिनेमात मोठी भूमिका साकारली होती. त्याच वेळी, गेल्या वर्षापासून आत्तापर्यंत, डिनोने 'मेंटलहुड', 'होस्टेज' आणि 'तांडव'सारख्या अनेक डिजिटल प्रकल्पांमध्ये पाहिले गेले आहे. अलीकडेच तो 'द एम्पायर' सीरिजमध्ये दिसला होता, त्याच्या भूमिकेला मिळालेली पसंती पाहून चाहते आजही त्याच्यावर तितकेच प्रेम करतात.
डिनोने वेबसिरीज सोडली तर सिनेमात झळकलेला नाही याविषयी त्याने सांगितले की, त्याला मिळत असलेल्या ऑफर खूप वाईट होत्या. 'जर मी त्या भूमिका स्विकारल्या असत्या तर माझ्या करिअरवर याचा परिणाम झाला असता. त्या सिनेमांमुळे 'ये क्या बकवास कर रहा है?' 'ये क्या कर रहा है, फ्लॉप अभिनेता म्हणूनच मला बोलले गेले असते.
हव्या तशा भूमिका न मिळाल्यामुळे त्या नाकारल्या होत्या. मिळालेल्या ऑफर्स नाकारणे खूप कठीण होते.कारण रसिकांना सतत कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून आपण दिसलेही पाहिजे. जर कलाकार दिसलाच नाही तर तो कधी रसिकांच्या विस्मृतीत जाईल हेही कळणार नाही. पण मी चांगल्याच भूमिका करणार यावर ठाम होतो. उगाच काम मिळतेय म्हणून करणे मला पटत नव्हते. विश्वास होता की चांगल्या भूमिकाही ऑफर होतील आणि तशा काही मिळाल्याही. मिळालेल्या भूमिका उत्तम साकारण्याचा प्रयत्न केला.
दोन पैसे कमावता यावे यासाठी अनेकदा न पटणाऱ्या भूमिका साकारण्याचा विचारही मनात आला. कारण घरही चालवायचे होते. पैसेच नाही कमावले तर लाईट बिल भरणे इतर घरखर्च कसा भागणार हा ही मोठा प्रश्न सतावत होता. पण हार मानली नाही. आलेली वेळही निघून जाईल आणि ज्या गोष्टीतून समाधान मिळेल असेच काम करणार या गोष्टीचा निर्धार केला आणि कामावर विश्वास ठेवला. क्वॉटींटीमध्ये काम करण्यापेक्षा क्वॉलिटीवाले काम करणे नेहमीच चांगले असे मी मानतो.