दिग्दर्शनात 'अँक्शन मास्टर' ‘फ्लॉप’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:07 AM2016-01-16T01:07:00+5:302016-02-05T13:51:51+5:30
शाम कौशल वीरू देवगन बालिवूडच्या मसाला चित्रपटांचा इतिहास पाहिला तर, या चित्रपटांच्या यशात सर्वात मोठे योगदान अँक्शन दृश्यांना द्यावे ...
श म कौशल वीरू देवगन बालिवूडच्या मसाला चित्रपटांचा इतिहास पाहिला तर, या चित्रपटांच्या यशात सर्वात मोठे योगदान अँक्शन दृश्यांना द्यावे लागेल. अँक्शन चित्रपटांना सामान्य दर्शक जास्त आवडीने बघतात, म्हणूनच अँक्शन चित्रपटांची निर्मिती प्रत्येक काळात कायम राहिली. अँक्शन चित्रपटांच्या यशात अँक्शन मास्टरची मेहनत जास्त राहते. बॉलिवूडच्या इतिहासात बरेच अँक्शन मास्टर असे होते की, ज्यांनी दिग्दर्शनाच्या मैदानात पाऊल ठेवले आणि सर्वांनी आपआपल्या चित्रपटांमध्ये स्वाभाविकच अँक्शन ओरिएंटेड चित्रपट बनविले, मात्र यातील कोणाच्याही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. याच कारणाने कोणताच अँक्शन मास्टर या क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यात यशस्वी नाही झाला. अँक्शन मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले राम शेट्टी हे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात येणारे पहिले व्यक्ती होते. त्यांनी 80 व्या दशकात चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरुन संजय दत्त सोबत 'खतरनाक' चित्रपट बनविला. 90 मध्ये श्रीदेवी सोबत बनलेल्या 'आर्मी'पासून या क्षेत्रात पाऊल ठेवले. 'शोले'च्या थीमवर बनलेल्या या चित्रपटात शाहरुखखानने पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. बॉक्स ऑफिस वर चित्रपट विशेष काही करूशकला नाही. राम शेट्टी नंतर अजून एक स्टंट डायरेक्टर पप्पू वर्माने दिग्दर्शनाच्या मैदानात उडी घेतली. याकाळात पप्पू वर्मा आणि त्यांचे भाऊ अँक्शन मास्टरच्या भूमिकेत वेगाने पुढे आले. पप्पू वर्मा शिवाय त्यांचे भाऊ टीनू वर्मादेखील दिग्दर्शक बनले. त्यांचे अजून एक भाऊ महेंद्र वर्माने देखील स्टंट मास्टर म्हणून बर्याच चित्रपटात काम केले. योगायोग असा की, राम शेट्टी सारखाच पप्पू वर्माने देखील अगोदर संजय दत्तचा चित्रपट 'जान की बाजी' (1985) सोबत निर्मितीत पाऊल ठेवले. 1992 मध्ये 'वंश' चित्रपटापासून पप्पू वर्मा दिग्दर्शनात आले. दोन सावत्र भावांवर बनलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ आणि सुदेश बेरी यांची प्रमुखभूमिका होती. या चित्रपटाचे गाणे सुपर हिट झाले.