दिशा म्हणाली, टायगर व माझ्यात ‘तसले’ काही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2016 04:33 PM2016-06-28T16:33:05+5:302016-06-28T22:03:05+5:30
टायगर श्रॉफ व दीशा पटानी या लव्ह बर्ड्स मधील प्रेम सध्या चांगलेच फुलतयं. अर्थात टायगर वा दीशा दोघेही अन्य ...
ट यगर श्रॉफ व दीशा पटानी या लव्ह बर्ड्स मधील प्रेम सध्या चांगलेच फुलतयं. अर्थात टायगर वा दीशा दोघेही अन्य बॉलिवूड कपलप्रमाणे त्यांचे नाते लपवू पाहत आहेत. टायगर व दीशाचे पहिले सींगल ‘बेफिक्रा’आज रिलीज झाले. यावेळी टायगर व दीशा दोघांनीही त्यांच्यातील उमलते प्रेम लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. साहजिकच दीशाला पत्रकारांनी टायगरसोबतच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न केला. मग काय, दीशाने नेहमीप्रमाणे आमच्यात तसले काही नाही, असेच उत्तर दिले. टायगर व मी चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र डान्स करतो, खेळतो. त्यामुळेच एकमेकांसोबत सहज असतो. राहिली गोष्ट आमच्या आऊटींगची तर चांगले मित्र एकत्र डिनरला, मुव्हीला जाऊ शकतातच. यात काहीही नवे नाही, असे दीशा म्हणाली. अशावेळी टायगर बोलणार नाही तर नवल...आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवणे आवडते, असे टायगर म्हणाला. पत्रकारांनी तरिही या दोघांचा पिच्छा सोडला नाही. आत्ता नाही पण भविष्यात तुम्ही दोघांमध्ये तसले काही होऊ शकते का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर ‘आय एम ट्रार्इंग यार...असे दीशा म्हणाली. पण दीशा पुढे बोलणार तोच..हा माझा डायलॉग आहे..असे सांगून टायगरने तिला मध्येच रोखले...व्वा शब्दांचा खेळ तुझ्याकडून शिकावा टायगर..काय???