अजय देवगणचा 'दृश्यम 3' कधी येणार? दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:41 IST2024-02-23T17:40:57+5:302024-02-23T17:41:34+5:30
'दृश्यम ३' ची चाहते वाट पाहत आहेत.

अजय देवगणचा 'दृश्यम 3' कधी येणार? दिग्दर्शकाने केला मोठा खुलासा
सध्याच्या घडीला हिंदी चित्रपटसृष्टीत अजय देवगणचा सर्वत्र बोलबाला आहे. सध्या तो 'शैतान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची काही दृश्ये पाहून चाहत्यांना 'दृश्यम'ची आठवण झाली. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'दृश्यम' या चित्रपटाने प्रेक्षकांना वेडं करून सोडलं होतं. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. त्याने विजय साळगावकरची भूमिका साकारली होती. 'दृश्यम' प्रमाणेच 'दृश्यम २' देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. आता चाहते 'दृश्यम ३' ची वाट पाहत आहेत. यासंदर्भात आता एक मोठं अपडेट आलं आहे.
नुकतेच 'शैतान' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला अजय देवगण, आर माधवन व्यतिरिक्त चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती. यावेळी चित्रपटाचे निर्माते अभिषेक पाठक यांना 'दृश्यम 3'बद्दल विचारण्यात आलं. 'दृश्यम 3' कधी फ्लोअरवर येणार आहे या प्रश्नावर ते म्हणाले, 'दृश्यम 3 हा कागदावर तयार झाला की शुटिंगला सुरुवात होईल. सध्या मी एक स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. त्यामुळे यावर्षी मी माझ्या पुढचा चित्रपटाचं दिग्दर्शन करेल'.
'दृश्यम 3'ही नक्की येणार हे या चित्रपटाच्या सिक्वेलच्या कथेच्या शेवटावरून स्पष्ट झालं होतं. मात्र, सध्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व व्यवसाय करून सर्वांना चकित केलं होतं. अजयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास शैतान सिनेमा हा 8 मार्चला रिलीज होणार आहे. तर यानंतर अजय 'सिंघम अगेन'मधून प्रेक्षकांच्या भेटील येईल. या सिनेमात अनेक मोठ्या स्टार्स कॅमिओ असणार आहे. यात अर्जुन कपूर या चित्रपटात एका भयानक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.