एका सिनेमामुळे राकेश रोशन यांनी घेतला मोठा निर्णय; तब्बल 46 वर्षांपासून करतायेत मुंडण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:09 PM2024-06-10T13:09:00+5:302024-06-10T13:09:30+5:30

Rakesh roshan: राकेश रोशन यांनी कायमस्वरुपी मुंडण करायचा निर्णय घेतला आणि आजही ते त्यांच्या या निर्णयावर ठाम आहेत.

director-actor rakesh-roshan-got-bald-for-jeetendra-amrita-singh-movie-khudgarz-46-years-actor-did-not-grow-back-hair-again-intriguing | एका सिनेमामुळे राकेश रोशन यांनी घेतला मोठा निर्णय; तब्बल 46 वर्षांपासून करतायेत मुंडण

एका सिनेमामुळे राकेश रोशन यांनी घेतला मोठा निर्णय; तब्बल 46 वर्षांपासून करतायेत मुंडण

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांची देवावर अपार श्रद्धा आहे. इतकंच नाही तर अनेकांनी त्यांच्या बुडत्या करिअरला वाचवण्यासाठी नवस, उपवास वगैरेही केले आहेत. यात एक असा अभिनेता, दिग्दर्शक आहे ज्याने त्याच्या सिनेमासाठी चक्क मुंडण केलं. विशेष म्हणजे त्याने कायमस्वरुपी मुंडण करायचा निर्णय घेतला आणि आजही ते त्यांच्या या निर्णयावर ठाम आहेत.

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती अभिनेता हृतिक रोशनचे वडील अर्थात अभिनेता, दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh roshan) यांची. आजवरच्या कारकिर्दीत त्यांची प्रत्येक भूमिका गाजली. इतकंच नाही तर त्यांनी दिग्दर्शित केलेला प्रत्येक सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यामुळे वरचेवर ते नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असतात. परंतु, सध्या ते त्यांच्या एका सिनेमा आणि त्यासाठी केलेलं मुंडण या गोष्टीमुळे चर्चेत आहेत.

१९८७ पासून राकेश रोशन करतायेत मुंडण

राकेश रोशन यांचं मुंडण करण्यामागे एक मोठं कारण आहे. १९८७ मध्ये त्यांनी मुंडण केलं जी परंपरा त्यांनी आजही जपली आहे. राकेश रोशन यांनी खुदगर्ज या सिनेमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं. परंतु, हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वी राकेश रोशन यांनी तिरुपती बालाजी मंदिरात एक नवस केला होता. हा सिनेमा हिट झाला तर देवाच्या चरणी केस अर्पण करेन, असा नवस त्यांनी केला होता. 

राकेश रोशन विसरले होते नवस

सिनेमा हिट झाल्यानंतर राकेश रोशन त्यांचा नवस फेडायला विसरले होते. परंतु, त्यांची पत्नी पिंकी यांनी त्यांना या नवसाची आठवण करुन दिली. त्यानंतर त्यांनी खून भरी मांग हा सिनेमा केला आणि तो हिट झाल्यावर केलेला नवसही फेडला.

Web Title: director-actor rakesh-roshan-got-bald-for-jeetendra-amrita-singh-movie-khudgarz-46-years-actor-did-not-grow-back-hair-again-intriguing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.