'पानिपत' चित्रपटासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 06:00 AM2020-01-14T06:00:00+5:302020-01-14T06:00:00+5:30
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला नुकतेच २६० वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने मराठ्यांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली.
भारत देशात गेल्या ५०० वर्षात आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे अशा अनेक वीरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासून जतन केल्या आहेत. अशीच एक पानिपतच्या लढाईची यशोगाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची पहिलीवहिली संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे सच्चे देशभक्त मराठा जे पानिपतच्या लढाईत प्राणपणाने लढले ज्यांनी आपली निष्ठा आणि शौर्याची कमाल मर्यादा गाठली अशा ऐतिहासिक पानिपतच्या मोठ्या लढाईचे चित्रण मोठ्या पद्यावर केले आहे. या चित्रपटात पानिपत युद्धाचे संपूर्ण चित्रण विषयाच्या प्रत्येक महत्वपूर्ण प्रसंग लक्षात घेऊन फक्त २ तास ३० मिनिटांत उलगडून दाखवला आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर ह्यांना हिंदवी स्वराज महासंघाकडून नुकताच सत्कार करण्यात आला.
१२ जानेवारी रोजी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला २६० वर्ष पूर्ण झाले असून , मराठ्यांच्या शौर्याला ह्या प्रसंगी मानवंदना देण्यात आली. यावेळी पेशवे, मराठे आणि मराठा सरदार यांचे वंशज या समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Heartfelt Gratitude!!
— Ashutosh Gowariker (@AshGowariker) January 9, 2020
Thank you Hon'ble CM @OfficeofUT ji 🙏 for imparting TAX FREE status in our attempt of bringing the Maratha Glory to the screen through #Panipat !
@duttsanjay@arjunk26@kritisanon#SunitaGowariker@RohitShelatkar@Shibasishsarkarpic.twitter.com/H374bAgrtk
दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर म्हणाले,"सत्कार नेहमी होतात कधी ते अवॉर्ड स्वरुपात असतात कधी अन्य स्वरुपाने होत असतात. पण जेव्हा सत्कार तुमच्या मातीतून तुमच्या लोकांकडून पवित्र भावनेतून करण्यात येतो त्याला शब्द नसतात. या देशाने आणि महाराष्ट्राने जे प्रेम चित्रपट पानिपतला आणि आम्हाला दिले आहे ते खूपच विशेष आहे."