दिग्दर्शिका कल्पना लाजमी म्हणतात, "मी अजून खचले नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 05:26 AM2017-11-10T05:26:42+5:302017-11-10T10:56:42+5:30

दिग्दर्शिका कल्पना लाजमी किडनी निकामी झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  कल्पना यांनी  सांगितले की स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर ...

Director Kalpana Lajmi says, "I have not lost it yet" | दिग्दर्शिका कल्पना लाजमी म्हणतात, "मी अजून खचले नाही"

दिग्दर्शिका कल्पना लाजमी म्हणतात, "मी अजून खचले नाही"

googlenewsNext
ग्दर्शिका कल्पना लाजमी किडनी निकामी झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  कल्पना यांनी  सांगितले की स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आलेल्या फोनमुळे मला खूप आधार मिळाला आहे. कल्पना सध्या रुग्णालयात आपल्या आजाराशी झुंज देत आहेत. त्या डायलिसिस वर आहेत. कल्पना यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या "माझी किडनी खराब झाल्या आहेत, पण मी अजून खचली नाही माझ्या कुटुंबीय आणि मित्र परिवार माझ्या मागे भक्कम पणे उभे आहेत. रुग्णालयात मला लता दीदींचा देखील फोन आला. त्यामी मला काही मदती हवी असेल तर सांग अशी विचारणा केली. मी म्हणाले फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे." 

 त्या पुढे म्हणाल्या "हा आठवडा माझ्यासाठी खूप कठीण होता. पण आता मी बारी होतेय. मला आठवड्यातून चार वेळा डायलिसिस करावे लागत आहे त्यामुळे मी आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या कमजोर झाले आहे, पण माझे प्रिय मित्र आमिर खान, रोहित शेट्टी, सलमान खान आणि माझी सर्वात जवळची मैत्रीण नीना गुप्ता, सोनी राजदान यांच्या  मदतीने मी डायलिसिस करत आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त मदत जर मला कोणी केली तर ती माझ्या आईने. (कलाकार ललिता लाजमी) 

कल्पना म्हणतात "मला आशा आहे की मी चित्रपट निर्मिती मध्ये पुनरागमन करेन, आता चित्रपटाची भाषा बदलली आहे. एक वेळ होती जेव्हा माझ्या एक पल आणि रुदाली या चित्रपटांची प्रशंसा केली गेली होती पण आता काळ बदलला आहे. आता आपण महेश भट्टच्या काळातून आलिया भट्टच्या काळात आलो आहे. माझा आतापर्यंतचा प्रवास अतिशय सुखद होता आता तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा की ह्या दोन तीन दिवसात मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल. 

 कल्पना या जवळपास ४० वर्षे संगीत दिग्दर्शक भूपेन हजारिका यांच्या बिझनेस पार्टनर होत्या. भूपेन हजारिका यांच्यावर बायोपिक बनवण्याचा त्यांचा मानस आहे. 

Web Title: Director Kalpana Lajmi says, "I have not lost it yet"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.