अखेर ५२ वर्षीय करण जोहरला मिळाला लाइफ पार्टनर? म्हणाला- "तो माझ्या सर्व गोष्टी ऐकतो अन्..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 10:15 IST2025-01-13T10:14:51+5:302025-01-13T10:15:49+5:30

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या डेटिंगबद्दल खुलासा केलाय. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन करणने ही गोष्ट सांगितली आहे

director producer Karan Johar finally found a life partner revealed on instagram | अखेर ५२ वर्षीय करण जोहरला मिळाला लाइफ पार्टनर? म्हणाला- "तो माझ्या सर्व गोष्टी ऐकतो अन्..."

अखेर ५२ वर्षीय करण जोहरला मिळाला लाइफ पार्टनर? म्हणाला- "तो माझ्या सर्व गोष्टी ऐकतो अन्..."

निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (karan johar) हा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. करणने 'बाहुबली' सारख्या साउथ सिनेमांनाही सपोर्ट करुन दाक्षिणात्य सिनेसृष्टीत निर्माता म्हणून स्वतःचा दबदबा निर्माण केला. करण जोहर ५२ वर्षांचा असून तो आजवर सिंगल आहे. करणने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करुन तो कोणाला डेट करतोय याचा खुलासा केलाय. करण जोहरने खुलासा करुन सर्वांनाच चकीत करणारं उत्तर दिलंय. काय म्हणाला करण? म्हणाला.

करण जोहरने पोस्ट करुन केला खुलासा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर खुलासा केला की, "मी इन्स्टाग्रामला डेट करतोय. तो माझ्या सर्व गोष्टी ऐकतो. माझ्या स्वप्नांचा पाठलाग करायला तो शिकवतो याशिवाय माझी बिलंही तो चुकवतो. त्यामुळे त्याच्यावर प्रेम न करण्याचं कोणतंही कारण मला सापडत नाही." अशी पोस्ट करुन करण जोहरने सर्वांनाच चकीत केलंय. अशाप्रकारे करण जोहर कोणा व्यक्तीला डेट करत नसून इन्स्टाग्रामला डेट करतोय. करण जोहर सिंगल पॅरंट असून त्याला यश आणि रुही ही दोन मुलं आहेत.

करण जोहरचं वर्कफ्रंट

करण जोहरवर अनेकदा तो फक्त स्टारकिड्सला लाँच करुन नेपोटिझमला प्रोत्साहन देतो असा आरोप करण्यात आला. अखेर या आरोपांना प्रत्युत्तर देणारं एक टी-शर्ट करण जोहरने परिधान केलं होतं. त्यावर नेपो-बेबी असं लिहिलं होतं. करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्याने कार्तिक आर्यनच्या 'तू मैंरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. हा सिनेमा २०२६ ला रिलीज होतोय.

 

Web Title: director producer Karan Johar finally found a life partner revealed on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.