सातत्याने वजनात घट, भूक लागत नव्हती अन्...; या गंभीर आजाराशी श्याम बेनेगल देत होते झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:41 IST2024-12-24T11:41:00+5:302024-12-24T11:41:54+5:30
श्याम बेनेगल यांचं काल गंभीर आजारामुळे निधन झालं. नेमका काय होता हा आजार

सातत्याने वजनात घट, भूक लागत नव्हती अन्...; या गंभीर आजाराशी श्याम बेनेगल देत होते झुंज
भारतीय मनोरंजन विश्वातील प्रख्यात सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं काल निधन झालं. सोमवारी (२४ डिसेंबरला) श्याम बेनेगल यांनी अखेरचा श्वास घेतला. श्याम बेनेगल यांच्या निधनाने आशयघन सिनेमांची निर्मिती करणारा एक दिग्दर्शक गमावल्याची भावना प्रत्येक सिनेरसिकाच्या मनात आहे. १४ डिसेंबरलाच श्याम बेनेगल यांनी त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून श्याम बेनेगल गंभीर आजाराशी झुंज देत होते. काय होता हा आजार?
या आजाराशी श्याम बेनेगल यांची झुंज
श्याम बेनेगल यांना Chronic Kidney Disease (CKD) हा आजार झाला होता. या आजारात शरीरातील किडनी काम करणं हळूहळू कमी करते. शरीर अशक्त होत जातं. या आजारामुळे रक्त शुद्धीकरण होत नाही आणि त्यामुळे शरीरामध्ये वेस्ट जमा होतं. श्याम बेनेगल यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं की, या आजारामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून श्याम बेनेगल यांनी काम करणं कमी केलं होतं. त्यांना कायम थकवा, अशक्तपणा आणि भूक लागत नव्हती.
सातत्याने वजनात होत होती घट
या आजारामुळे श्याम बेनेगल यांच्या वजनात सातत्याने घट होत होती. ते बाहेरचे पदार्थ खाणं टाळायचे. आपल्या प्रकृतीची ते कायम काळजी घ्यायचे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्यात त्यांना त्रास होत होता. त्यांना अनेकदा एलर्जीसारखा त्रास व्हायचा. अशाप्रकारे श्याम बेनेगल गेल्या अनेक काळापासून CKD शी झुंज देत होते. श्याम बेनेगल यांचे सिनेमे आजही अभ्यासले जातात. दर्दी आणि आशयघन सिनेमे पाहणाऱ्या प्रेक्षकांना श्याम बेनेगल यांची कमी नक्कीच जाणवेल,