रूपेरी पडद्यावर दिग्दर्शकांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:20 AM2016-01-16T01:20:33+5:302016-02-08T04:36:27+5:30

काही वर्षांपूर्वी मधूर भंडारकर यांनी 'ट्राफिक सिग्नल' नावाचा सिनेमा बनवला. त्यावेळी त्यांनी या चित्रपटात आपले मित्र दिग्दर्शक सुधीर मिश्रा ...

Director's entry on the silver screen | रूपेरी पडद्यावर दिग्दर्शकांची एन्ट्री

रूपेरी पडद्यावर दिग्दर्शकांची एन्ट्री

googlenewsNext
ही वर्षांपूर्वी मधूर भंडारकर यांनी 'ट्राफिक सिग्नल' नावाचा सिनेमा बनवला. त्यावेळी त्यांनी या चित्रपटात आपले मित्र दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांना पडद्यावर अभिनेता म्हणून आणून सर्वांना चकीत केले होते आणि त्याचवेळी मधूर हसता हसता म्हणाले होते, कुणी सांगावे एक दिवस मीसुद्धा आपल्याला पडद्यावर एखादी भूमिका करताना दिसेल. आता खरच तसे घडले आहे. गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'कॅलेंडर गर्ल्स'मध्ये मधूरने ही जुनी इच्छा पूर्ण केली आणि ते आपल्याच चित्रपटात पडद्यावर दिसले. कॅमेराच्या मागून उडी घेत कॅमेर्‍याच्या समोर येऊन अभिनय करणार्‍या दिग्दर्शकांची यादी तशी मोठीच आहे. या यादीत तिग्मांशू धुलिया यांचे नाव खूप पुढेआहे. जे नुकतेच केतन मेहता यांच्या 'माउंटेन मॅन- मांझी' आणि नंतर निखिल आडवाणी यांच्या 'हिरो'मध्ये कलाकार म्हणून दिसले. यापूर्वीही त्यांनी अनुराग कश्यप यांच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये भूमिका केली आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांच्या रिव्हॉल्वर राणी आणि बुलेट राजाचे बॉक्स ऑफिसवर काय झाले, ही तशी वेगळी कथा आहे. गँग्स ऑफ वासेपूरमध्ये तिग्मांशू धुलिया यांना अभिनेता करणारे अनुराग कश्यप यांनीही नाना पाटेकरसोबत शागिर्दमध्ये अभिनय केला आहे.बॉम्बे वेलवेटचा परिणाम समोर आहे. याच चित्रपटात करण जाैहर खलनायक झाले होते. खंबाटाची भूमिका करुन आपली हशा करुन घेणारे करण जाैहर यांनी त्याचा परिणाम पाहून कान पकडले की यापुढे कोणत्याही चित्रपटात ते अभिनय करणार नाहीत. असे मानले जाते की स्वत: पडद्यावर दिसण्याच्या छंदाला बॉलिवूडमध्ये सुभाष घई यांनी प्रोत्साहन दिले. पुणे इंस्टिट्यूटमधून अभिनयात सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) मिळविल्यानंतरदेखील घई हे अभिनयात यशस्वी ठरले नाही, मात्र दिग्दर्शनात त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात किमान एका दृश्यात पडद्यावर दिसण्याची हौस भागवून घेतली. ज्याला अनेक दिग्दर्शकांनी फॉलो केले. या ओळीत रोहित शेट्टी यांचेदेखील नाव आहे, जे एकता कपूरच्या कंपनीचा चित्रपट 'क्या सुपर कूल हैं हम'च्या एका दृश्यात दिसले होते. अभिनेता म्हणून काम करणार्‍या दिग्दर्शकांच्या यादीत फरहा खान आणि कुणाल कोहली यांचे देखील नाव आहे.फरहा यांनी बोमन ईरानी यांच्यासोबत शीरिन फरहाद यांच्या तो निकल पड.ी सिनेमात अभिनेत्री म्हणून काम केले. 

Web Title: Director's entry on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.