बिपाशा बसूला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; सोशल मीडियावर दिली गुड न्यूज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 02:53 PM2018-06-06T14:53:18+5:302018-06-06T21:54:37+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वी छातीचा त्रास असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या अभिनेत्री बिपाशा बसूला डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबतची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Discharge from Bipasha Basu Hospital; Good news on social media! | बिपाशा बसूला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; सोशल मीडियावर दिली गुड न्यूज!

बिपाशा बसूला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज; सोशल मीडियावर दिली गुड न्यूज!

googlenewsNext
िनेत्री बिपाशा बसू हिला आज हिंदुजा हेल्थ केअर येथून घरी जाण्याची डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. घरी परताच बिपाशाने आपल्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करीत, ‘घरी परतली आहे,’ अशी चाहत्यांना गुड न्यूज दिली. बिपाशाचा हा व्हिडीओ सध्या तिच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे. तिच्या या व्हिडीओमुळे चाहत्यांना आनंद झाला नसेल तरच नवल. कारण बºयाचशा चाहत्यांनी तिला सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी कॉमेण्ट्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
 

दरम्यान, छातीत इन्फेक्शन असल्यामुळे बिपाशाला २ जून रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिने हॉस्पिटलमधून काही मजेशीर फोटोही पोस्ट केले होते. सुरुवातीच्या फोटोमध्ये बिपाशा आजारी असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र नंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे फोटोवरून दिसून येत होते. दरम्यान, आता बिपाशा घरी परतल्याने तिच्या चाहत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सर्व तपासण्या केल्यानंतर बिपाशाची प्रकृती ठणठणीत असल्याचे समोर आले. त्यानंतरच तिला डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपूर्ण कालावधीत डॉक्टर किंजल यांनी तिची देखभाल केली. दरम्यान, गेल्या बºयाच काळापासून बिपाशा पडद्यावरून गायब आहे. काही दिवसांपूर्वीच एक बातमी समोर आली होती, ज्यामध्ये ती पती करणसिंग ग्रोवरबरोबर कमबॅक करीत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अचानकच बिपाशाची प्रकृती बिघडल्याने हा प्रोजेक्ट काही काळ पुढे ढकलण्यात आला होता. 

Web Title: Discharge from Bipasha Basu Hospital; Good news on social media!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.