दिशा पटानीचा हा अंदाज तुम्ही पाहिला आहे?, मेकअपविनाही खुलले सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 11:00 IST2019-04-23T10:59:09+5:302019-04-23T11:00:53+5:30
बागी 2’मध्ये आपला जलवा दाखवणारी दिशा सोशल मीडियावर सतत स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते.सध्या दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे.

दिशा पटानीचा हा अंदाज तुम्ही पाहिला आहे?, मेकअपविनाही खुलले सौंदर्य
सिनेमा असो किंवा एखादा इव्हेंट.सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्री स्वत:च्या मेकअपवर बरीच मेहनत घेतात. या अभिनेत्रींच्या सौंदर्यावर कित्येक जण घायाळ होतात. त्यांचं हे सौंदर्य... अदा... लुक्स पाहून त्यांच्यासारखं सुंदर दिसावं असं अनेकांना वाटतं. मात्र रिल आणि चमचमत्या दुनियेतल्या या अभिनेत्री रियल लाइफमध्ये मेकअपविना कशा दिसतात याची अनेकांना उत्सुकता असते. सध्या अभिनेत्री दिशा पटानीचे विविध अदा असलेले फोटो सोशल मीडियावर अधिक पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते.
मात्र अता तिचे विनामेकअप फोटोंनाही पसंती मिळत असून चाहते तिचे कौतुकही करताना दिसतायेत.
कुणालाही मोहात पाडेल असे दिशाचं सौंदर्य... मेकअपविना तिचा हा अवतार साधा वाटत असला तरी गोरीपान दिशा कुणालाही भुरळ घालेल... मेकअप असो किंवा नसो तिचा अंदाज कायम सारखाच असतो... तिच्या स्टाईल आणि सौंदर्यात फारसा फरक तुम्हाला जाणवणार नाही... त्यामुळे फॅन्सना तिचा हा रिअल अवतार जास्त पसंत असल्याचे यावरून पाहायला मिळत आहे.
सेलेना गोमेजच्या ‘आय कान्ट गेट इनफ’ या नव्या गाण्यावर थिरकल्यानंतर अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली होती. तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताच केवळ दोनच तासांत २ लाखांवर लोकांनी ते पाहिलेत होते.‘बागी 2’मध्ये आपला जलवा दाखवणारी दिशा सोशल मीडियावर सतत स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करत असते.
सध्या दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटींग संपले आहे.‘भारत’ या चित्रपटात दिशा प्रथमच सलमान खान, कॅटरिना कैफ, नोरा फतेही, तब्बूसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल.