Malang Movie Poster : दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर दिसले किस करताना, 'मलंग'चा पोस्टर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 15:22 IST2020-01-04T15:21:31+5:302020-01-04T15:22:01+5:30
Malang Movie Poster : दिशा पटानी व आदित्य रॉय कपूरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Malang Movie Poster : दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर दिसले किस करताना, 'मलंग'चा पोस्टर रिलीज
दिशा पटानी व आदित्य रॉय कपूरने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बॉलिवूडमधील हे दोघे लवकरच मलंग चित्रपटात झळकणार आहेत. नुकतेच त्यांनी या चित्रपटासाठी अंडरवॉटर किसिंग सीक्वेन्स शूट केला जो जवळपास 1 मिनिटांचा होता. या सीक्वेन्सची सगळीकडे चर्चा होत असताना आता त्यांचा किस करतानाचा पोस्टर समोर आला आहे.
मलंग चित्रपटाचा नवीन पोस्टर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात आदित्य रॉय कपूर व दिशा पटानी बोल्ड अंदाजात किस करताना दिसले. या फोटोत दिशा आदित्यच्या खांद्यावर बसली आहे आणि त्याला किस करते आहे.
हा पोस्टर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या पोस्टरला खूप लाईक्स मिळत आहे आणि हा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काल रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये आदित्य रॉय कपूर शर्टलेस होऊन रागाने ओरडताना दिसतो आहे. या फोटोत त्याच्या हाताची नस व आर्मी स्टाईलची हेअरस्टाईल व दाढीमध्ये तो एकदम वेगळा दिसतो आहे. हा फोटो शेअर करत आदित्यने लिहिले की, प्रेमासारखाच द्वेषदेखील पवित्र असते.
मलंग चित्रपटाचा ट्रेलर ६ जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशिकी २चे दिग्दर्शक मोहित सूरीने केले आहे.
तर भूषण, लव रंजन, अंकुर व जय शेवकरमनी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.