'भारत' चित्रपटात हेलन यांच्या रुपात दिसणार ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:02 PM2018-08-14T13:02:12+5:302018-08-14T13:06:38+5:30
२०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन 'भारत' हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
अभिनेत्री दिशा पटानीने 'बागी 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची व टाइगर श्रॉफची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती. या चित्रपटानंतर आता तिच्याकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स आहेत. त्यात बॉलिवूडचा दबंग खान सलमानसोबत ती 'भारत' चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
'भारत' चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची चर्चा सगळीकडे रंगली आहे. या चित्रपटात कोण कलाकार असणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या चित्रपटामध्ये कलाकारांची मंदियाळी दिसणार असून यात दिशाचीही वर्णी लागली आहे. या चित्रपटात दिशा अभिनेत्री हेलन यांच्या रेट्रो लूकमध्ये दिसणार आहे. त्यामुळे दिशा शिमरी, स्टडेड व फेदर यांसारख्या आऊटफीटमध्ये पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतमध्ये दिशा ट्रिपीज आर्टिस्टची भूमिका वठविणार आहे. त्यामुळे तिच्या लूककडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. दिशाच्या या लूकसाठी साठच्या दशकात सर्कसमधील आर्टिस्ट ज्या पद्धतीचे कपडे घालायचे त्या कपड्यांची डिजाईन आणि हेलन यांनी अॅर्नेजेटिक डान्स परफॉर्मेसमध्ये घातलेल्या ड्रेसची डिजाईन या दोन्ही ड्रेसच्या रचनेवरुन दिशाच्या या ड्रेसची डिजाईन करण्यात आली आहे. दरम्यान, हा ड्रेस सलमानची बहीण अलवीरा अग्निहोत्री आणि आंतरराष्ट्रीय डिजायनर अॅशले रोबेलो यांनी डिजाईन केला आहे. या ड्रेसमध्ये स्टोन,क्रिस्टल, ट्युब टसल यांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. त्यामुळे दिशा पहिल्यांदाच एका वेगळ्या लूकमध्ये चाहत्यांसमोर येणार आहे.
२०१४ साली प्रद्रशित झालेला दक्षिण कोरियाई चित्रपट 'ओड टू माई फादर'मधून प्रेरणा घेऊन 'भारत' हा चित्रपट बनवण्यात आला आहे. 'भारत' चित्रपटाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. हा सिनेमा २०१९ला ईदमध्ये प्रदर्शित होणार आहे.