पाहा व्हिडीओ : दिशा पटानीचा बॉडीगार्ड संतापला; मग घडले असे...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 14:28 IST2020-02-24T14:27:42+5:302020-02-24T14:28:43+5:30

दिशा पटानीचा बॉडीगार्ड संतापला. बघता बघता प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत आले...

disha patani bodyguard pushes cameraman did physical fight with him | पाहा व्हिडीओ : दिशा पटानीचा बॉडीगार्ड संतापला; मग घडले असे...!

पाहा व्हिडीओ : दिशा पटानीचा बॉडीगार्ड संतापला; मग घडले असे...!

ठळक मुद्देनुकताच दिशाचा ‘मलंग’ हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटाने 55 कोटींची कमाई केली.

बॉलिवूड सेलिब्रिटी दिसले रे दिसले की त्यांचे फोटो, व्हिडीओ घेण्यासाठी पापाराझी तुटून पडतात. यासाठी पापाराझींचे कॅमेरे सतत सेलिब्रिटींना फॉलो करतात. अर्थात हे करताना अनेकदा पापाराझींना स्टार्सच्या तर कधी स्टार्सच्या सुरक्षारक्षकांच्या संतापाचा सामना करावा लागतो. अलीकडे एका कॅमेरामॅनसोबत असाच प्रसंग ओढवला. होय, दिशा पाटनीच्या बॉडीगार्डने या कॅमेरामॅनला रोखले आणि बघता बघता प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत आले. अर्थात या संपूर्ण प्रकरणानंतर दिशाच्या मॅनेजरने माफी मागितली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  


व्हिडीओत दिशा एका ठिकाणावरून बाहेर पडताना दिसतेय. तिचा बॉडीगार्ड तिच्या समोर चालतोय. याचदरम्यान अचानक एक कॅमेरामॅन दिशाच्या गाडीजवळ येतो आणि तिचे फोटो क्लिक करू लागतो. हे पाहून बॉडीगार्डचा पारा चढतो व तो कॅमेरामॅनला मागून धक्का देतो. प्रकरण वाढते आणि दोन्ही बाजूने वादविवाद सुरु होता. दिशा मात्र यावर काहीही रिअ‍ॅक्ट न होता गाडीत बसते.


फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तूर्तास या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी फोटोग्राफरला चूक ठरवत बॉडीगार्डची बाजू घेतली आहे. तर काहींनी फोटोग्राफरला पाठींबा दिला आहे. तुम्ही सेलिब्रिटींच्या मागे का धावता? दोष त्यांचा नाही तुमचा आहे, असे अनेकांनी फोटोग्राफर्सला उद्देशून लिहिले आहे. तर काहींनी, तुम्ही भाव देणे सोडा, सेलिब्रिटी आपोआप जागेवर येतील, असा सल्ला दिला आहे.
दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, नुकताच तिचा ‘मलंग’ हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटाने 55 कोटींची कमाई केली.

Web Title: disha patani bodyguard pushes cameraman did physical fight with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.