दिशा पाटनीला कधीच व्हायचं नव्हतं अभिनेत्री, पण एका स्पर्धेने बदललं तिचं असं नशीब
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 06:41 PM2023-06-19T18:41:40+5:302023-06-19T18:57:42+5:30
दिशा पाटनी एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा येऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवीचं शिक्षण घेतलं दिशा पाटनीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha patani) तिच्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलने लोकांचं लक्ष वेधतं असते. तिच्या इंस्टाग्रामवर तुम्हाला अनेक बोल्ड आणि हॉट फोटो पाहायला मिळतील. उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या दिशाला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं खरं तर.
दिशा पाटनी एमिटी यूनिवर्सिटी, नोएडा येऊन इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगमधून पदवीचं शिक्षण घेतलं दिशा पाटनीला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. होय... दिशाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न नव्हते. तिला भारतीय हवाई दलात पायलट व्हायचे होते.
दिशा पाटनीने मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, लखनऊमध्ये तिच्या इंजिनीअरिंगदरम्यान एका मैत्रिणीने तिला मॉडेलिंग स्पर्धेबद्दल सांगितले होते. याच स्पर्धेने तिला मुंबईत आणले. ही स्पर्धा ती जिंकली आणि तिच्या मॉडेलिंगच्या प्रवासाची सुरुवात झाली. ही स्पर्धा जिंकल्यानंतर तिला मॉडेलिंग प्रोजेक्टमध्ये काम मिळू लागले.
.तिने 2013 मध्ये पॉन्ड्स फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला,यास्पर्धेत ती फर्स्ट रनरअप ठरली. यानंतर दिशाची ओळख वाढली. दिशाने सिनेमातील करिअरची सुरुवात २०१५ मध्ये दक्षिण भारतातील प्रसिद्ध दिग्दर्शक जगन्नाथ पुरी यांचा सिनेमा लोफरपासून केली होती. ज्याठिकाणी ते वरूण तेजसोबत दिसली. या सिनेमात तिने हैदराबादमधील एका मुलीची भूमिका साकारली. त्यानंतर दिशाच्या करिअरमध्ये काही विशेष बदल झाला नाही.
दिशा पाटनीला २०१६ भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी यांच्या बायोपिक सिनेमा धोनी एन अनटोल्ड स्टोरीत काम करण्याची संधी मिळाली. या सिनेमात महेंद्र सिंग धोनची पहिली प्रेयसी प्रियंका हिची भूमिका तिने केली होती.