Hotness Alert! दिशा पटनीच्या बिकीनी फोटोची रंगली चर्चा, कृष्णा श्रॉफच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 12:46 IST2020-11-20T12:45:38+5:302020-11-20T12:46:13+5:30
दिशाने आणखी एक नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती एका ब्लू बिकीनीमध्ये दिसत आहे. दिशाच्या या अंदाजाने समुद्राच्या पाण्यात जणू आग लावली आहे.

Hotness Alert! दिशा पटनीच्या बिकीनी फोटोची रंगली चर्चा, कृष्णा श्रॉफच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष....
दिशा पटानीने इन्स्टाग्रामवर आपल्या फॅन्ससाठी एक खास फोटो शेअर केला. काही दिवसांपूर्वी दिशा मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. अशीही चर्चा आहे की, यावेळी टायगर श्रॉफ तिच्यासोबत होता. ती मुंबईत परतली आणि मालदीव्सचे खास फोटो इन्स्टावर शेअर करत आहे. दिशाने आणखी एक नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती एका ब्लू बिकीनीमध्ये दिसत आहे. दिशाच्या या अंदाजाने समुद्राच्या पाण्यात जणू आग लावली आहे. या फोटोवर टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने केलेल्या कमेंटने दोघींतील प्रेम दिसून येतं.
दिशाने एक बिकीनीतील समुद किनाऱ्यावरील फोटो शेअर केला आहे. यात ती सनबाथ घेताना दिसत आहे. वर निळं आकाश, समोर निळा समुद्र आणि दिशाची निळ्या रंगाची बिकीनी सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. दिशाने हा फोटो शेअर करत एका फुलाचा इमोजी टाकला आहे.
या फोटोला केवळ १५ तासात २.३ मिलियनपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्सही करत आहेत. इतकेच काय तर दिशाचा हा फोटो टायगर श्रॉफने देखील लाइक केलाय. तर टायगरची बहीण कृष्णाने Inspooo अशी कमेंट केली आहे. याचा अर्थ प्रेरणा असा होतो. म्हणजे कृष्णाने हे स्पष्ट केलं की, दिशाकडून ती इन्स्पायर्ड आहे. पण कृष्णाच्या कमेंटला रिप्लाय करत दिशाने लिहिले की, 'नाही, मी तुझ्याकडून इन्स्पायर्ड आहे'.
दिशाच्या या फोटोवर कृष्णासोबतच एली अवरामने देखील 'आह'अशी कमेंट केली आहे. ज्यावरही दिशाने इमोजीच्या माध्यमातून रिप्लाय दिलाय. दिशाचे बोल्ड फोटो नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अनेक फोटो तर टायगरच्या कमेंटमुळे गाजतात.