प्रभासबरोबर डेटिंगच्या चर्चा, दिशा पटानीने शेअर केला टॅटूचा फोटो, म्हणते- "माझ्या टॅटूबद्दल..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 01:54 PM2024-07-03T13:54:44+5:302024-07-03T13:55:15+5:30

दिशा पटानीच्या हातावरील टॅटूमुळे तिच्या आणि प्रभासच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. डेटिंगच्या चर्चांनंतर आता दिशा पटानीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

disha patani shared criptic post amid rumours of dating with south star prabhas | प्रभासबरोबर डेटिंगच्या चर्चा, दिशा पटानीने शेअर केला टॅटूचा फोटो, म्हणते- "माझ्या टॅटूबद्दल..."

प्रभासबरोबर डेटिंगच्या चर्चा, दिशा पटानीने शेअर केला टॅटूचा फोटो, म्हणते- "माझ्या टॅटूबद्दल..."

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या चर्चेत आली आहे. दिशा पटानी सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दिशा पटानीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दिशा पटानीच्या हातावरील टॅटूमुळे तिच्या आणि प्रभासच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. डेटिंगच्या चर्चांनंतर आता दिशा पटानीने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. 

दिशा पटानीने हातावर "PD" असं लिहिलेला टॅटू काढला आहे. या टॅटूचा संबंध नेटकऱ्यांनी प्रभासशी जोडला आहे. "PD" म्हणजे प्रभास आणि दिशा असा संदर्भ लावत त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. प्रभासबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आता दिशाने एक पोस्ट शेअर केली आहे. दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातावरील टॅटू स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने या चर्चांवर भाष्य केलं आहे. 

"माझ्या टॅटूबद्दल लोकांमध्ये एवढं कुतुहल पाहून मला आश्चर्य वाटतंय", असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. दिशा पटानीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. "प्रभास आणि दिशा की अजून काही?", "प्रभास डार्लिंग" असं नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

दरम्यान, दिशाने २०१५ साली लोफर या तामिळ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 'एक व्हिलन', 'बाघी २', 'MS Dhoni : द अनटोल्ड स्टोरी', 'भारत' यांसारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. 'कल्कि 2898 AD' या सिनेमातून दिशा आणि प्रभास प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रभास आधी दिशाचं नाव टायगर श्रॉफशी जोडलं गेलं होतं. ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काहीच महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं. 
 

Web Title: disha patani shared criptic post amid rumours of dating with south star prabhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.