66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे दिल्लीत वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 11:31 AM2019-12-23T11:31:04+5:302019-12-23T11:31:09+5:30
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी एक समिती नेमण्यात येते ज्यामध्ये नि:पक्षपातीपणाने विजेते निवडले जातात. या समितीममध्ये नावाजलेले चित्रपट निर्माते,दिग्दर्शक आणि कलाविश्वातील काही चेह-यांचा समावेश असतो.
चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीत वितरण करण्यात येत आहे. आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या भाषांमधील सर्वोत्कृष्ठ सिनेमांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे.
दिल्लीमध्ये हे पुरस्काराचे वितरण होत असून अंधाधुन सर्वोत्कृष्ठ सिनेमा तर आयुष्मान आणि विकी कौशल सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमार स्टारर चित्रपट सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ या चित्रपटाला दोन पुरस्कार जाहीर झाले होते. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार श्रीनिवास पोकळेला तर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्काराने सुधाकर रेड्डी यांचा गौरव.
हा सोहळा Live पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा- https://www.youtube.com/watch?v=4Wx94DCD_50
राष्ट्रीय पुरस्कार विजेते-
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट - टर्टल
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- अंधाधुन
सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट- हमीद
सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट- महान्ती
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट- बिलबुल कॅन सिंग
सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट- हारजीता
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - रेवा
सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपट- केजीएफ -विक्रम मोर
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत)
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- कीर्ति सुरेश (महानती, तेलुगू)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - आयुषमान खुराना (अंधाधून)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - विकी कौशल (उरी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी) (सुवर्ण कमळ)
पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅनसर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी एक समिती नेमण्यात येते ज्यामध्ये नि:पक्षपातीपणाने विजेते निवडले जातात. या समितीममध्ये नावाजलेले चित्रपट निर्माते,दिग्दर्शक आणि कलाविश्वातील काही चेह-यांचा समावेश असतो. या पुरस्कारांमध्ये चित्रपटांना प्रोत्साहित करणा-या राज्याचाही सन्मान करण्यात येतो.