'रंग'च्या स्क्रीनिंगदरम्यान दिव्या भारतीची आत्मा भटकत होती! आयशा जुल्काने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:47 IST2025-03-19T15:46:37+5:302025-03-19T15:47:16+5:30
Ayesha Jhulka And Divya Bharti : 'जो जीता वही सिकंदर', 'कुर्बान' आणि 'वक्त हमारा है' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असलेल्या आयशा जुल्काने एका मुलाखतीत दिव्या भारतीबद्दल अंगावर काटा आणणारे प्रसंग सांगितले आहेत.

'रंग'च्या स्क्रीनिंगदरम्यान दिव्या भारतीची आत्मा भटकत होती! आयशा जुल्काने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
'जो जीता वही सिकंदर', 'कुर्बान' आणि 'वक्त हमारा है' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा भाग असलेल्या आयशा जुल्का(Ayesha Jhulka)ने एका मुलाखतीत दिव्या भारती(Divya Bharti)बद्दल अंगावर काटा आणणारे प्रसंग सांगितले आहेत. आयशा जुल्काने सांगितले की, 'रंग' चित्रपटाच्या स्क्रिनिंगला दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती आजूबाजूला असल्याचे जाणवले. अभिनेत्रीने असे काही पाहिले की तिला वाटले की दिव्या भारती तिथे आहे.
आयशा जुल्काशिवाय दिव्या भारतीही 'रंग'मध्ये होती. दोघांचे खूप चांगले बॉडिंग होते. दिव्या भारतीने या चित्रपटात आयशा जुल्काच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आयशाने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दिव्यासुद्धा 'वक्त हमारा है'च्या सेटवर रोज यायची. कधी ती मॅचिंग शूज आणायची, कधी आणखी काही. एके दिवशी जेव्हा दिव्या भारतीने पाहिले की आयशाने टिकली लावली नाही, तेव्हा तिने मेकअप रूममध्ये धाव घेतली आणि टिकली आणली.
दिव्या भारतीने जगाचा घेतला निरोप
दिव्या भारतीचे ५ एप्रिल १९९३ रोजी निधन झाले. त्या वेळी ती १९ वर्षांची होती. ती त्यांच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडली होती आणि दारूच्या नशेत होती, असे सांगण्यात येते. पण आजही दिव्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. दिव्याच्या आकस्मिक निधनामुळे तिचे अनेक चित्रपट अपूर्ण राहिले. काही चित्रपट तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित करण्यात आले, तर काही सिनेमात इतर अभिनेत्रींना कास्ट करुन पुन्हा शूटिंग करावे लागले.
दिव्या भारती असल्याचा झाला अभिनेत्रीला भास
आयशा जुल्काने सांगितले की, जेव्हा ती 'रंग'साठी डब करत होती तेव्हा ती दिव्या भारतीसोबतचं सीन डब करू शकली नाही. ती रडायला लागली आणि मोठ्याने ओरडू लागली. यामुळे डबिंग पुढे ढकलावे लागले. नंतर, 'रंग'च्या प्रीमियरदरम्यान, जेव्हा दिव्या भारतीचा सीन आला तेव्हा स्क्रीन पडली. हे पाहून आयशा जुल्का हादरून गेली. अभिनेत्रीने सांगितले की ती बराच वेळ शांतपणे झोपू शकली नाही.
'रंग' रिलीज होण्यापूर्वीच दिव्या भारतीचे झाले निधन
'रंग' १९९३ साली रिलीज झाला होता आणि तो तलत जानी यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपट पूर्ण झाला, पण रिलीज होण्यापूर्वीच दिव्या भारतीचे निधन झाले.