काय म्हणता? अति गोरेपणामुळे रिजेक्ट झाली होती ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 12:58 IST2020-01-16T12:57:53+5:302020-01-16T12:58:24+5:30
या अभिनेत्रीची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अर्थात इथपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्याला प्रचंड संघर्ष करावा लागला.

काय म्हणता? अति गोरेपणामुळे रिजेक्ट झाली होती ही अभिनेत्री
वीरजारा, भाग मिल्खा भाग, देल्ही 6 यासारख्या चित्रपटांत झळकलेली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री दिव्या दत्ता हिची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अर्थात इथपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेक नकार पचवत दिव्या इथपर्यंत पोहोचली. एकदा तर केवळ गो-या रंगामुळे एक चित्रपट तिला हातचा गमवावा लागला.
होय, एका ताज्या मुलाखतीत दिव्याने हा किस्सा सांगितले. मला अनेकदा नकार पचवावे लागले. एकदा तर मी खूप गोरी आहे म्हणून दिग्दर्शकाने मला चित्रपटात घेण्यास नकार दिला होता. या चित्रपटात गावातल्या मुलीची भूमिका होती. खेडे गावातली मुलगी सावळी असायला हवी, असे दिग्दर्शकाचे मत होते. त्यावेळी मला खूप वाईट वाटले होते. कारण चित्रपटाच्या कथेचा मुलीच्या रंगरूपाशी काहीही संबंध नव्हता, असे दिव्याने यावेळी सांगितले. ‘दिल्ली 6’ या सिनेमात मी सावळी दिसावी, यासाठी मेकअप केला गेला होता. पहाटे चार वाजता उठून या मेकअपसाठी मी सेटवर जायचे, असेही तिने सांगितले.
‘वीरजारा’ या चित्रपटाने दिव्या फिल्मी करिअरला गती दिली. याबद्दलही ती बोलली. या चित्रपटात काम केल्यानंतर भूमिका ही फक्त ग्लॅमरस असणे महत्त्वाचे नाही, हे मला ‘वीरजारा’ केल्यानंतर कळले, असे तिने सांगितले. एका फेमस अभिनेत्रीला ‘वीरजारा’तील माझी भूमिका साकारायची इच्छा होती, हे मला दिग्दर्शकाने सांगितले तेव्हा आधी विश्वास बसला नव्हता. पण हा चित्रपट केल्यानंतर या भूमिकेचे महत्त्व मला कळले, असेही दिव्या म्हणाली.