सलमानसोबत पोझ देणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का? आज आहे लोकप्रिय अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 04:21 PM2022-01-04T16:21:20+5:302022-01-04T16:22:31+5:30
Bollywood Actress Childhood Pics : सलमान तेव्हा स्टार होता आणि ती उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला फिरायला गेली होती. सलमानला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. फोटोत तो स्पष्ट दिसतोय. पुढे याच सलमानसोबत तिनं काम केलं...
आपल्या लाडक्या कलाकारांचे जुने फोटो पाहायला कुणाला आवडणार नाही. सेलिब्रिटी अनेकदा स्वत:चे बालपणी, शालेय जीवनातले, कॉलेजातले फोटो शेअर करतात आणि ते क्षणात व्हायरल होतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या फोटोत तिच्यासोबत सलमान खानही (Salman Khan) दिसतोय. सलमान तेव्हा स्टार होता आणि ती उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबईला फिरायला गेली होती. सलमानला भेटल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. फोटोत तो स्पष्ट दिसतोय. पुढे याच सलमानसोबत तिनं काम केलं, हे विशेष. फोटोतील ही अभिनेत्री कोण, हे अद्यापही तुम्ही ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. तिचं नाव दिव्या दत्ता (Divya Dutta).
होय, बॉलिवूडची हरहुन्नरी अभिनेत्री दिव्या दत्तानं तिचा एक थ्रोबॅक फोटो आणि या फोटोशी निगडीत आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Found a major throwback! Wen we visited Mumbai in our summer vacations and me n @drrahulsdutta got our pics clicked with my ever fav @BeingSalmanKhan .look at my excited expression! A few years later i shared screen space with him.. life. #thestarsinmyskypic.twitter.com/ycpKhT3tHR
— Divya Dutta (@divyadutta25) January 3, 2022
‘ जेव्हा मी आणि राहूल. एस. दत्ता सुट्टीसाठी मुंबईला गेलो होतो. तेव्हा आम्ही आमच्या आवडत्या स्टारला म्हणजेच सलमान खानला भेटलो. फोटोमधील माझी एक्साइटमेंट पाहा. त्यानंतर काही वर्षांनी मी सलमानसोबत चित्रपटामध्ये काम केलं,’ असं तिनं या फोटोसोबत लिहिलं आहे.
तुम्हाला आठवत असेलच की, ‘वीरगती’ आणि ‘बागबान’ या सिनेमात दिव्या व सलमानने एकत्र काम केलं आहे.
वीरजारा, भाग मिल्खा भाग, देल्ही 6 यासारख्या चित्रपटांत झळकलेली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री दिव्या दत्ता हिची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अर्थात इथपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेक नकार पचवत दिव्या इथपर्यंत पोहोचली. 1994 साली ‘इश्क में जीना, इश्क में मरना’ या चित्रपटातून तिने डेब्यू केला होता.