Divya Khosla Injured: अ‍ॅक्शन सीन करताना दिव्या खोसला झाली गंभीर जखमी, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 08:02 PM2023-03-15T20:02:29+5:302023-03-15T20:03:29+5:30

दिव्याला तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची बातमी आहे.

Divya khosla injured while filming an action scene for her upcoming project | Divya Khosla Injured: अ‍ॅक्शन सीन करताना दिव्या खोसला झाली गंभीर जखमी, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

Divya Khosla Injured: अ‍ॅक्शन सीन करताना दिव्या खोसला झाली गंभीर जखमी, फोटो पाहून चाहते पडले चिंतेत

googlenewsNext

अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार नेहमीच चर्चेत असते. कधी ती थंडीत शुटिंग करताना दिसते तर कधी एखाद्या इव्हेंटमध्ये तिच्या सुंदर लूकनं चाहत्यांना घायाळ करत असते. मात्र, यावेळी तिने चाहत्यांना धक्का दिला आहे. अभिनेत्री शेअर केलेले तिचे लेटेस्ट फोटो खरोखरच भयानक आहेत. सध्या दिव्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, दिव्याला तिच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची बातमी आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टावर जखमांसोबतचे अनेक फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

दिव्या खोसला कुमारने तिचे जखमी फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या खुणा दिसत आहेत. चेहऱ्यावर झालेल्या दुखापतीमुळे रेड मार्क झाले आहेत. एका फोटोत तिचे डोळेही भरलेले दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना दिव्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या आगामी प्रोजेक्टच्या अॅक्शन सीनचे शूटिंग करताना मला खूप दुखापत झाली. पण शो मस्ट गो ऑन. तुमच्या सर्व प्रार्थनांची गरज आहे. दिव्याचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिव्या खोसला कुमारने तिच्या मोस्ट अवेटेड सिक्वेल 'यारियां 2' च्या शूटिंगबद्दल माहिती दिली होती. तिने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, चित्रपटाचे शूटिंग यूकेमध्ये होणार आहे.

यारियां 2 यावर्षी 20 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे दिव्या खोसला सात वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. त्याचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट 'सनम रे' (2016) होता. या चित्रपटात पुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला यांनी काम केले आहे. दरम्यान, 'यारियां 2' च्या स्टार कास्टबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात मीझान जाफरी, वारीना हुसैन, अनस्वरा राजन, पर्ल व्ही पुरी आणि प्रिया प्रकाश वारियर यांच्याही भूमिका आहेत, जे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या कुमार खोसला आणि आयुष मल्होत्रा ​​हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
 

Web Title: Divya khosla injured while filming an action scene for her upcoming project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.