"करण जोहर मला गप्प करण्यासाठी..."; दिव्या खोसलाचे 'जिगरा'च्या निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 15:11 IST2024-10-16T15:10:50+5:302024-10-16T15:11:57+5:30
अभिनेत्री-निर्माती दिव्या खोसलाने पुन्हा एकदा 'जिगरा' सिनेमाची टीमवर गंभीर आरोप करुन करण जोहरवर टीका केलीय (divya khosla kumar, jigra, karan johar)

"करण जोहर मला गप्प करण्यासाठी..."; दिव्या खोसलाचे 'जिगरा'च्या निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप
दिव्या खोसला कुमार ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री-निर्माती-दिग्दर्शिका. दिव्या खोसला गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. दिव्याने काही दिवसांपूर्वी आलियाच्या 'जिगरा' सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बोट ठेऊन गंभीर आरोप केले. थिएटर रिकामं असूनही जिगरा टीम फेक कलेक्शन दाखवत असल्याचं आलिया म्हणाली. अशातच दिव्या खोसला कुमारने पुन्हा एकदा 'जिगरा' सिनेमाच्या टीमवर आरोप करुन थेट करण जोहरवर टीका केलीय.
दिव्याचे करण जोहरवर आरोप
आलियाच्या 'जिगरा' सिनेमाची कथा आणि काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या दिव्याच्या 'सावी' सिनेमाची कथा मिळतीजुळती असल्याचं दिव्याने सांगितलं. आता हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिव्या म्हणाली, "मी अन्यायाविरोधात आवाज उठवत आहे तर मिस्टर करण जोहर मला गप्प करण्यासाठी माझा अपमान करत आहेत. चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलेला मूर्ख बोलणं योग्य आहे का? जर माझ्यासोबत असं झालंय तर इंडस्ट्रीतील नवीन लोकांसोबत काय होत असेल? इथे कोणी राजा नाही. त्यामुळे मला कोणीही अशी वागणूक नाही देऊ शकत."
दिव्या खोसला पुढे म्हणाली, "असेच आणखीही अपमानजनक शब्द आहेत ज्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या PR लेखांमध्ये केलाय. मी चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवतेय तर त्या गोष्टीला PR स्टंट बोललं जातंय. मला माफ करा पण मला याची आवश्यकता नाही. मला आधीपासून लोक खूप चांगलं ओळखतात." अशाप्रकारे दिव्याने करण जोहरवर आरोप केले आहेत. दरम्यान या सर्व प्रकरणात आलिया भट मात्र गप्प आहे. आता दिव्या आणि 'जिगरा'च्या टीमचा हा वाद आणखी कोणतं टोक गाठणार, हे पाहायचं आहे.