OMG! जया बच्चन पुन्हा संतापल्या, फोटोग्राफर्सच्या मागे धावत सुटल्या...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 03:33 PM2022-10-25T15:33:09+5:302022-10-25T15:35:53+5:30
Jaya Bachchan Viral Video : जया बच्चन यांच्या अँग्री अवताराचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर आहेत. आता यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे.
Jaya Bachchan Viral Video : महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan ) त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जातात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जया भडकल्याचे किस्से आहेत. कधी मीडियावर, कधी सेल्फी घेणाऱ्यांवर जया भडकल्यात. अनेकदा संसदेतही त्यांचा ‘अँग्री’ अवतार पाहायला मिळाला. सन 2017 मध्ये हेमामालिनीची मुलगी इशा देओल हिच्या डोहाळ जेवणावेळी जया चक्क भटजींवर संतापल्या होत्या. यानंतर सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांवरही त्या बरसल्या होत्या. ‘डोन्ट डू दिस, स्टुपिड’ अशा शब्दांत त्यांनी एका चाहत्याला सुनावलं होतं. त्यांच्या या अँग्री अवताराचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर आहेत. आता यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे.
होय, दिवाळीच्या दिवशीच जया बच्चन पापाराझींवर अशा काही बरसल्या की, त्यांचा तो अवतार बघून सगळेच थक्क झालेत. काल बच्चन कुटुंबाने दिवाळीची पार्टी आयोजित केली होती. बच्चन कुटुंबाची दिवाळी पार्टी पापाराझींसाठी नेहमीच खास असते. अशात हे खास क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींनी बच्चन कुटुंबाच्या ‘प्रतीक्षा’ बाहेर गर्दी केली होती. पण जयांना पापाराझींनी घराबाहेर केलेली ही गर्दी आवडली नाही. मग काय, त्या स्वत: घराबाहेर आल्या आणि त्यांनी पापाराझींचा पिच्छा करत, त्यांना चांगलंच फटकारलं.
जया बच्चन यांचा हा अँग्री अवतार नवा नाही. पण हा ताजा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी जया यांना चांगलंच सुनावलं. ‘इसका हर बार कुछ ना कुछ होता ही है, इतना घमंड तो रावण का भी नहीं था,’ अशी कमेंट एका युजरने केली.
जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे अनेकांना पडलेले कोडे आहे. पण मध्यंतरीे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. होय, जया अचानक संतापतात याचं कारण आहे, त्यांचा आजार.
श्वेताने करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोदरम्यान याचा खुलासा केला. जया बच्चन या claustrophobic या आजाराने पीडित आहे. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. या आजाराने पीडित व्यक्ती अचानक गर्दी पाहून बेचैन होते. अनेकदा तिला राग येतो. गर्दीच्या ठिकाणी हे लोक अस्वस्थ होतात. श्वेताने सांगितल्या नुसार, गर्दी पाहिली की, जया अस्वस्थ होतात. कुणी धक्का दिलेला वा चुकूनही स्पर्श केलेले त्यांना सहन होत नाही. कॅमेºया प्रकाश डोळ्यांवर पडला तरी त्यांना त्रास होतो. कदाचित हेच कारण आहे की, मीडियाला अनेकदा त्यांच्या संतापाचा सामना करावा लागतो.