मी नियम तोडतेय का? - बेबो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2016 11:28 AM2016-02-16T11:28:55+5:302016-02-16T04:28:55+5:30
अभिनेत्री करिना कपूर खान ही नेहमी आगळ्यावेगळ्या भूमिका शोधत असते. तिला भूमिका आवडली तरच ती चित्रपटासाठी होकार देते. तिचा ...
भिनेत्री करिना कपूर खान ही नेहमी आगळ्यावेगळ्या भूमिका शोधत असते. तिला भूमिका आवडली तरच ती चित्रपटासाठी होकार देते. तिचा आगामी चित्रपट ‘की अँण्ड का’ मध्ये ती अर्जुन कपूर सोबत अभिनय करत आहे. ती म्हणते की,‘तरूण अभिनेत्यासोबत मी काम करतेय तर मी काही चुकीचे करत आहे का? तर नाही.’ ‘की अॅण्ड का’ चित्रपटात करिनाने करिअर ओरिएंटेड महिलेची भूमिका केली आहे. तिने अर्जुन कपूर सोबत महत्त्वाकांक्षी महिलेची भूमिका केली आहे. ‘मी कुठलाही नियम मोडत नाहीये. मी एक अभिनेत्री असून माझ्या रक्तातच अभिनय आहे. मी आत्तापर्यंत अनेकांसोबत काम केले आहे. कलाकाराने ज्याच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल आहात त्याच्यासोबत काम करावे. नेहमीच्याच जोड्या कधीकधी काम करत नाहीत. पण अशा वेगळ्या जोड्या कधीकधी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.