नेपोटिजमचा अर्थ माहित नाही? मग सोनम कपूर सांगतेयं, ते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 05:49 AM2017-12-14T05:49:59+5:302017-12-14T11:22:47+5:30

या संपूर्ण वर्षात बॉलिवूडबद्दल कुठली चर्चा गाजली असेल तर ती नेपोटिजमवरची. होय, यंदा बॉलिवूडमध्ये या मुद्यावर कधी नव्हे इतकी ...

Do not know the meaning of Napotojim? Then Sonam Kapoor tells you, read it! | नेपोटिजमचा अर्थ माहित नाही? मग सोनम कपूर सांगतेयं, ते वाचा!

नेपोटिजमचा अर्थ माहित नाही? मग सोनम कपूर सांगतेयं, ते वाचा!

googlenewsNext
संपूर्ण वर्षात बॉलिवूडबद्दल कुठली चर्चा गाजली असेल तर ती नेपोटिजमवरची. होय, यंदा बॉलिवूडमध्ये या मुद्यावर कधी नव्हे इतकी चर्चा झाली. अभिनेत्री कंगना राणौत हिने नेपोटिजमच्या वादाला सर्वप्रथम तोंड फोडले. करण जोहरला ‘मुव्ही माफिया’ म्हणत तिने त्याच्यावर नेपोटिजमचा आरोप केला. यानंतर या मुद्यावर अनेक बºया वाईट प्रतिक्रिया आल्या. इंडस्ट्रीतील काहींनी कंगनाची बाजू घेतली तर बहुतांश लोक करण जोहरच्या कडाने उभे राहिलेत. अजूनही नेपोटिजमवरची चर्चा सुरुच आहे. पण या संपूर्ण चर्चेत नेपोटिजम म्हणजे काय, हेच लोकांना माहित नाहीय. अर्थात हे आम्ही नाही तर अभिनेत्री सोनम कपूरचे मत आहे. खूप कमी लोकांना नेपोटिजम या शब्दाचा अर्थ माहित आहे, असे सोनमने म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर लोकांचे अज्ञान गृहीत धरून तिनेच या शब्दाचा अर्थही सांगितला आहे.

होय, अलीकडे एका चॅट शोमध्ये सोनम कपूर या मुद्यावर बोलली. ‘संपूर्ण इंडस्ट्री नेपोटिजमवरील चर्चेत सामील झाली. पण या चर्चेदरम्यान माझे म्हणाल तर मी नुसते हसत होते. अर्धे ज्ञान धोकादायक असते, असे म्हणतात. त्यामुळे नेपोटिजम या शब्दाचा अर्थ टिष्ट्वटरवर सांगावा का, असा प्रश्न मला पडला होता. माझ्या मम्मीने मात्र या सगळ्यांपासून दूर राहण्याचे मला बजावले होते. नेपोटिजमचा अर्थ फार कमी लोकांना   ठाऊक आहे. मला याचा अर्थ सांगताना आनंद होईल. कुठल्याही रिलेशनमुळे तुम्हाला एखादे काम मिळत असेल तर त्यास नेपोटिजम म्हणतात. तुम्ही कुणासोबत झोपत असाल, कुणाची गर्लफ्रेन्ड असाल, कुणाची मित्र वा कुण्या परिवाराचा भाग असाल आणि म्हणून तुम्हाला काम मिळत असेल तर ते नेपोटिजम आहे. तुमच्याकडे डिक्शनरी वाचायला वेळ असेल किंवा आॅनलाईन जावून तुम्ही या शब्दाचा अर्थ समजू शकत असाल तर याचा नेमका अर्थ तुम्हाला कळेल. नेपोटिजम फिल्म इंडस्ट्रीसोबतच सर्व इंडस्ट्रीसाठी लागू होते. यावरच्या वादाला नाहक हवा दिली गेली आहे. माझी बहीण (निर्माता व डिझाईनर रिया कपूर)च्या कंपनीत काही इंटर्न्स फ्रांन्समधून शिफारसीवर आले आहेत. शिफारसीवरून मिळालेली नोकरी पण नेपोटिजमममध्येच येते. त्यामुळे हा इतका मोठा मुद्दा का ठरतोय, हे मला कळत नाहीये,’ असे सोनम यावेळी म्हणाली.

ALSO READ : ​समलैंगिकतेच्या मुद्यावर सोनम कपूरचा श्री श्रींना थेट सवाल! वाचा सविस्तर!!

Web Title: Do not know the meaning of Napotojim? Then Sonam Kapoor tells you, read it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.