'हस मत पगले'!! ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’चे हे दुसरे गाणेही लावेल तुम्हाला वेड!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 08:25 AM2017-06-29T08:25:33+5:302017-06-29T13:55:33+5:30
अक्षय कुमारच्या बहुप्रतीक्षीत ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘हस मत पगले...’ आज रिलीज झाले. या गाण्याचे मेल व्हर्जन आधीच आपण ऐकले आहे.
अ ्षय कुमारच्या बहुप्रतीक्षीत ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘हस मत पगले...’ आज रिलीज झाले. या गाण्याचे मेल व्हर्जन आधीच आपण ऐकले आहे. यात अक्षय म्हणजेच केशव त्याची लेडी लव्ह जया अर्थात भूमी पेडणेकर हिच्या प्रेमात वेडा झालेला दिसतो. आता याच गाण्याचे फिमेल व्हर्जन रिलीज झालेय. यात जया तिच्या मनातील भावना बोलून दाखवतेय. मनातल्या मनात ती सुद्धा केशवची झालीय.
या गाण्याच्या सुरुवातीला असलेला एक डायलॉग आपले लक्ष्य वेधून घेतो. ‘चश्मे से लेकर जूते तक सारे ब्रांड नकली और विदेशी है, पर साला आदमी देशी हू. अब तुम देख लो किसी आॅडनरी डॉक्टर, आईएएस, इंजीनियर के पल्ले बंधना है या लाइफ में फिर रोमांस चाहिए’,असे अक्षय यात म्हणतो. काल रिलीज झालेल्या गाण्यात केशव जयाचे लपून छपून फोटो घेतो तर आज रिलीज झालेल्या गाण्यात जया केशवचे लपत छपत व्हिडिओ काढताना दिसते आणि ते पाहून स्वत:च खूश होते.
ALSO READ : ‘टॉयलेट एक प्रेम कथा’च्या ट्रेलरमधून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश!
श्रेषा घोषाल हिच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलेल्या या गाण्याचे बोल आहेत, सिद्धार्थ व गरिमा यांचे. येत्या ११ आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयने केशव नामक पात्र साकारले आहे. याऊलट भूमीने जया नामक व्यक्तिरेखा रंगवली आहे. चित्रपटात केशव व जयाची प्रेमकथा दिसणार आहे. दोघांचेही लग्न होते. पण घरात शौचालय नाही, या कारणावरून दोघांचेही लग्न तुटण्यापर्यंत येते. ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला समर्थन करणार आहे. या चित्रपटातून स्वच्छता न राखणा-यांवर विनोदाच्या माध्यमातून टीका करण्यात आली आहे. केशव हा पे अॅण्ड युज टॉयलेट चालवत असतो. यादरम्यान जया नामक मुलीच्या केशव प्रेमात पडतो आणि पुढे दोघांचे लग्न होते. या चित्रपटाच्या माध्यमातून एक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला आहे.