​काय पाहायचे काय नाही लोकांना ठरवू द्या, हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2016 12:08 PM2016-06-10T12:08:05+5:302016-06-10T17:38:05+5:30

‘उडता पंजाब’ चित्रपटातील काही संवाद व दृश्यांना कात्री लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेन्सॉर बोर्डाला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले. ...

Do not let the people decide what to see, the High Court has censored the censor board | ​काय पाहायचे काय नाही लोकांना ठरवू द्या, हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला खडसावले

​काय पाहायचे काय नाही लोकांना ठरवू द्या, हायकोर्टाने सेन्सॉर बोर्डाला खडसावले

googlenewsNext
डता पंजाब’ चित्रपटातील काही संवाद व दृश्यांना कात्री लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेन्सॉर बोर्डाला शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले. दूरचित्रवाणी असू दे की चित्रपट काय पाहायचे काय नाही, हे लोकांना ठरवू द्या. प्रत्येकाला आपापली आवड असते. त्याप्रमाणे तो निर्णय घेतो, असे न्यायालयाने सुनावणीवेळी आपले निरीक्षण नोंदवले. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहणारा प्रेक्षक सुजाण असतो, असेही न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने सोमवारपर्यंत तहकूब केली. सोमवारी पुढील सुनावणीनंतर न्यायालय निकाल देऊ शकते.

‘उडता पंजाब’ प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी स्थगित झालेल्या सुनावणीला शुक्रवारी परत सुरुवात झाली. सेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी चित्रपटातील अनेक संवाद, शब्द आक्षेपार्ह असल्याचे न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले. या चित्रपटात एका कुत्र्याला चॅकी चेन नाव देण्यात आले आहे. ते आक्षेपार्ह आहे. त्याचबरोबर चित्रपटात एक संवाद आहे. त्यामध्ये ‘जमीन बंजर और औलाद कंजर’ असे म्हणण्यात आले आहे. यामधील ‘कंजर’शब्दाला मंडळाने आक्षेप घेतला. ‘कंजर’ शब्द बदनामी करणारा असल्याचे मंडळाच्या वकिलांनी म्हटले आहे. ज्या दृश्यांना मंडळाने कात्री लावण्याचे सुचविलेले आहेत, ते अत्यंत बीभत्स आहेत, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.

‘गो गोवा गोन’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ अशी नावे असलेल्या चित्रपटांना हिरवा कंदील दाखवणाºया चित्रपट परीनिरीक्षण मंडळाला ‘उडता पंजाब’ चित्रपटात ‘पंजाब’ असा उल्लेख असलेला फलक दाखविण्यास विरोध का, त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला कसा धक्का पोहोचणार आहे, असे प्रश्न न्यायालयाने गुरुवारी मंडळाला विचारले होते.

Web Title: Do not let the people decide what to see, the High Court has censored the censor board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.