Don't miss : ‘बाहुबली’च्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 08:33 AM2017-01-22T08:33:48+5:302017-01-22T14:03:48+5:30

‘बाहुबली’च्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’ हा चित्रपट तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलात. लवकरच या चित्रपटाचा दुसरा ...

Do not miss: A big news for fans of 'Bahubali' ...! | Don't miss : ‘बाहुबली’च्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी...!

Don't miss : ‘बाहुबली’च्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी...!

googlenewsNext
ाहुबली’च्या चाहत्यांसाठी एक फक्कड बातमी आहे. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’ हा चित्रपट तुम्ही मोठ्या पडद्यावर पाहिलात. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजे ‘बाहुबली: दी कन्क्लूजन’ तुम्ही बघणार आहात. पण आमच्याकडे बातमी आहे ती यापेक्षा वेगळी. होय, ‘बाहुबली: दी बिगीनिंग’आधीची कथा तुम्ही वाचू शकणार आहात. आत्तापर्यंत तुम्ही ‘बाहुबली’ला पडद्यावर पाहिलेत. पण आता तुम्ही ‘बाहुबली’ वाचू सुद्धा शकणार आहात. चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी एका साहित्य महोत्सवात एक पुस्तक प्रकाशित केले. यात ‘बाहुबली: दी बिगीनिंग’च्या आधीची संपूर्ण कथा कथन करण्यात आली आहे.

खरे तर,‘ कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’,हे जाणून घेण्यासाठी तुम्ही-आम्ही उत्सूक आहोत. ‘बाहुबली: दी बिगीनिंग’च्या दुस-या भागात याचे उत्तर मिळणार आहे. पण हा भाग यायला जरा अवकाश आहे. कारण हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. पण त्याआधी आपली उत्सूकता जरा शूवायची असेल तर ‘राइज आॅफ शिवगामी: बाहुबली बिफोर दी बिगीनिंग’ हे पुस्तक तुम्ही वाचू शकता. जयपूर साहित्य महोत्सवात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी  राजामौली यांच्यासोबतच ‘बाहुबली’मधील भल्लाळ देव म्हणजेच राणा डग्गूबाती हाही हजर होता. यावेळी त्याने या पुस्तकातील काही उतारे वाचून दाखवले. आनंद नीलकांतन यांनी हे पुस्तक लिहिले आहे.



या पुस्तकात ‘बाहुबली : दी बिगीनिंग’आधीची संपूर्ध कथा आहे. म्हणजेच शिवगामी आपल्या पित्याच्या हत्येचा सूड कसा घेतो, हे यात वाचायला मिळणार आहे. चित्रपटात ही भूमिका राम्या कृष्णन हिने साकारली आहे. येत्या ७ मार्चपासून हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध असेल.



Related stories : ​‘बाहुबली’ गर्ल तमन्ना भाटियाबद्दलचे हे ‘सत्य’ तुम्हाला माहित आहे का?
watch pics : ​‘बाहुबली2’चे ६१३ दिवस आणि शूटींग संपले...!!
 

Web Title: Do not miss: A big news for fans of 'Bahubali' ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.