DON'T MISS : गुरदास मानच्या ‘पंजाब’मधील चिमुकला भगतसिंह तुम्ही पाहिलात?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2017 10:19 AM2017-02-13T10:19:37+5:302017-02-13T15:49:37+5:30
पंजाबी जगतातील लोकप्रीय गायक आणि अभिनेता गुरदास मान याचा ‘पंजाब’ हा नवा अल्बम लवकरच रिलीज होतोय. या अल्बमचे पहिले गाणे अलीकडे लॉन्च करण्यात आले. हे संपूर्ण गाणे बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही.
प जाबी जगतातील लोकप्रीय गायक आणि अभिनेता गुरदास मान याचा ‘पंजाब’ हा नवा अल्बम लवकरच रिलीज होतोय. या अल्बमचे पहिले गाणे अलीकडे लॉन्च करण्यात आले. हे संपूर्ण गाणे बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही. हे गाणे लॉन्च झाल्यापासून लाखो लोकांनी ते पाहिले आहे.
या गाण्यात तुम्हाला भेटतो तो चिमुकला शहीद भगत सिंह.
देशासाठी शहिद झालेल्या भगतसिंहला गुरदास त्याच्या बाल्यावस्थेतील रूपात आजच्या भारताचे दर्शन घडवतो. स्वातंत्र्यानंतर देशात काय सुरु आहे, हे त्याला दाखवतो. येथे हिंसाचार होतोय, दिवसाढवळ्या महिलांच्या अब्रूवर हल्ले होत आहेत. लोक नशेत झिंगत आहेत. कुणी कुणाचे रक्त सांडवतोय, तर कुणी कुणावर अॅसिड हल्ला करतो तर कुणी नशेचे इंजेक्शन टोचून घेतोय. एका आईसाठी आज तिचे बाळ ही प्राथमिकता नाही तर आपल्या मुलासमोरच ती ड्रिंक करतेय. खेळण्याची मैदाने संपली आहेत, म्हणून नवे खेळाडू दिसेनासे झाले आहेत. लहानसा भगतसिंह हे सगळे पाहतो आणि रडायला लागतो. केवळ रडत नाही तर आपल्या इतिहासातून आपले नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न करतो.पण आजचा भारत पाहून मी माझी कथा बदलणार नाही, असे वचन चिमुकल्या भगतसिंहने आधीच गुरदासला दिलेले असते. गुरदास त्याला त्याच्या वचनाची आठवण करून देतो, असे हे गाणे आहे.
या गाण्यात दाखवलेला आजचा पंजाब आणि बाल भगत सिंहाची कहानी पाहून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. या गाण्याला यु-ट्यूबवर आत्तापर्यंत सुमारे ४३ लोकांनी पाहिले आहे. गुरदास याने त्याचा मुलगा गुरिक्क याच्या नजरेतून ‘पंजाब’ हा अल्बम बनवला आहे. या अल्बचे दुसरे गाणे येत्या मार्चमध्ये रिलीज होणार आहे. यानंतर १५ मार्चला हा संपूर्ण अल्बम रिलीज होणार आहे.