Don't Miss : ​‘हसीना पारकर’चा ‘इंटेन्स’ ट्रेलर आऊट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 08:55 AM2017-07-18T08:55:15+5:302017-07-18T14:25:15+5:30

श्रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘हसीना पारकर’चा ट्रेलर आज रिलीज झाला. आज रिलीज झालेला ट्रेलर चांगलाच दमदार आहे. हा ट्रेलर तुम्हाला थेट ९० च्या दशकात घेऊन जाईल.

Do not Miss: Haseena Parker's 'Intense' Trailer Out !! | Don't Miss : ​‘हसीना पारकर’चा ‘इंटेन्स’ ट्रेलर आऊट!!

Don't Miss : ​‘हसीना पारकर’चा ‘इंटेन्स’ ट्रेलर आऊट!!

googlenewsNext
रद्धा कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘हसीना पारकर’चा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये श्रद्धा कपूर एकदम हटक्या अंदाजात दिसते आहे. खरे तर  चित्रपटाचा टीजर रिलीज झाला, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. पण आज रिलीज झालेला ट्रेलर चांगलाच दमदार आहे. हा ट्रेलर तुम्हाला थेट ९० च्या दशकात घेऊन जाईल. 



हसीना पारकर ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण होती. मुंबईत तिला ‘आपा’ या नावाने ओळखले जाईल. दाऊद देश सोडून पळून गेल्यावर तिनेच त्याचा बेकायदेशीर कारभार सांभाळला होता.
ट्रेलरची सुरुवात मुंबईच्या एका सीनने होते. बॅकग्रॉऊंडला श्रद्धाचा आवाज ऐकू येतो. ‘मोहम्मद अली रोड का लफडा सुलझाने के लिए दुबई से फोन आएगा तुम्हे. चलेगा?’, असे ती म्हणतेय. खरे तर श्रद्धाचा आवाज या धमकीला जराही सूट होत नाही. जणू रट्टा मारून बळजबरीने ती हा संवाद म्हणतेय, असेच तो ऐकल्यानंतर वाटते. त्यामुळे ट्रेलरच्या सुरुवातीला श्रद्धा जराही इंप्रेस करत नाही. पण ट्रेलर संपेपर्यंत श्रद्धा तुमचे हृदय जिंकून घेते. ट्रेलरमध्ये हसीना पारकरची कथा दाखवली आहे. भाऊ दाऊदमुळे पोलिसांकडून तिला त्रास दिला जातो.   पतीच्या निधनानंतर मात्र तिचे आयुष्य एकदम बदलून जाते आणि इथून पुढे ती मुंबईची ‘आपा’ बनते. तिच्याशिवाय मुंबईचे पानही हलत नाही.

ALSO READ : बॉलिवूडमध्ये येण्याआधी श्रद्धा कपूरने केला हा जॉब!

ट्रेलरमध्ये श्रद्धाशिवाय तिचा भाऊ सिद्धांत कपूर हाही काही क्षणांसाठी दिसतो. सिद्धांत या चित्रपटात दाऊच्या भूमिकेत दिसणार आहे. एकंदर ट्रेलर बराच इंटेंन्स आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Do not Miss: Haseena Parker's 'Intense' Trailer Out !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.