DON'T MISS : सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’वरचे जोक्स वाचा अन् पोट धरून हसा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 07:39 AM2017-06-29T07:39:36+5:302017-06-29T13:10:04+5:30
सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फ्यूज झाला. या चित्रपटाकडून सलमानच्या चाहत्यांना बरीच अपेक्षा होती. पण सगळ्या अपेक्षा पाण्यात बुडाल्या. अर्थात ...
स मान खानचा ‘ट्यूबलाईट’ बॉक्सआॅफिसवर फ्यूज झाला. या चित्रपटाकडून सलमानच्या चाहत्यांना बरीच अपेक्षा होती. पण सगळ्या अपेक्षा पाण्यात बुडाल्या. अर्थात तरिही चाहत्यांचे सल्लूभाईवरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. सलमानचे चाहते भाईजानची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. याऊलट सलमानच्या ‘ट्यूबलाईट’ची टर उडवणारेही भरपूर आहेत. सोशल मीडियावर सध्या सलमान आणि त्याच्या ‘ट्यूबलाईट’वरील विनोदांचा पूर आला आहे. हे जोक्स वाचून तुमचे हसून हसून पोट दुखल्याशिवाय राहणार नाही. असे काही विनोद आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
विशेष म्हणजे, सुक्यासोबत ओलेही जळते, त्याप्रमाणे सलमानसोबत शाहरूखवरही विनोद होत आहे. ‘ट्यूबलाईट’मुळे शाहरूखच्या ‘फॅन’चीही आठवण ताजी झाली आहे. ‘ट्यूबलाईट’च्या निमित्ताने सोशल मीडियावर पडलेले हे जोक्स वाचून आम्ही खूप हसलो, तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्ही दाव्यानिशी सांगतो. तेव्हा वाचा आणि पोट धरून हसा!!
‘ट्यूबलाईट’चे देशभरातील शो कमी करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी शो रद्द करण्यात आल्याचीही खबर आहे. चित्रपटाला प्रेक्षकच नाहीत, असे मल्टिप्लेक्स मालकांचे म्हणणे आहे. ‘ट्यूबलाईट’ या चित्रपटाकडून सलमानला ब-याच अपेक्षा होत्या. या चित्रपटाची तुलना सलमानच्याच ‘बजरंगी भाईजान’सोबत केली जात होती.
रिलीजनंतरच्या पहिल्या तीन दिवसांत ‘बजरंगी भाईजान’ने १०२ कोटी रूपयांचा बिझनेस केला होता. याऊलट सर्वाधिक ५५५० स्क्रिन्सवर प्रदर्शित होऊनही रिलीजनंतरच्या तीन दिवसांत ‘ट्यूबलाईट’ला केवळ ६४ कोटींचा बिझनेस करता आला. ईदच्या मुहूर्तावर ‘ट्यूबलाईट’ पेटेल, असा अंदाज होता. पण सोमवारी ईदची सुट्टी असूनही ‘ट्यूबलाईट’ फार चमक दाखवू शकला नाही. सोमवारी या चित्रपटाने केवळ १९ कोटींचा गल्ला जमवला.
ALSO READ : Tubelight Movie review : नावाप्रमाणेच ‘ट्यूबलाईट’!!