‘रिमेक बनवून उत्कृष्ट कलाकृती खराब करू नका’- ज्येष्ठ अभिनेते संजय खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:54 PM2018-10-27T16:54:16+5:302018-10-27T16:55:54+5:30

माझे आयुष्य प्रचंड अनुभव, प्रसंगांनी व्यापलेले आहे. माझे मित्र पूर्वी नेहमी म्हणायचे की, गोष्टी सांगा आणि शांतपणे ऐकायचेही. कदाचित माझ्या आवाजाचा जादू असेल किंवा माझ्या कथा सांगण्यातच एक वेगळेपणा होता ज्यामुळे लहानपणीच माझ्या करिअरचे एक स्थान निर्माण झाले.

Do not spoil classic artwork by remake '- Veteran actor Sanjay Khan | ‘रिमेक बनवून उत्कृष्ट कलाकृती खराब करू नका’- ज्येष्ठ अभिनेते संजय खान

‘रिमेक बनवून उत्कृष्ट कलाकृती खराब करू नका’- ज्येष्ठ अभिनेते संजय खान

googlenewsNext

तेहसीन खान

‘हकिकत’,‘एक फूल दो माली’,‘इंतेकाम’, ‘साँस भी कभी बहू थी’ यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये ज्येष्ठ अभिनेता संजय खान यांनी अत्यंत हॅण्डसम व्यक्तिमत्त्वातील भूमिका साकारल्या. निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही त्यांनी नावलौकिक कमावला. अशातच त्यांनी ‘बेस्ट मिस्टेक आॅफ माय लाईफ’ हे पुस्तक लाँच केले असून  या पुस्तकाच्या लाँचिंग कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्यासोबत केलेली ही हितगुज...

* ‘बेस्ट मिस्टेक आॅफ माय लाईफ’ हे पुस्तक लिहिण्याचा विचार पूर्वीच केला होता का? 
- माझे आयुष्य प्रचंड अनुभव, प्रसंगांनी व्यापलेले आहे. माझे मित्र पूर्वी नेहमी म्हणायचे की, गोष्टी सांगा आणि शांतपणे ऐकायचेही. कदाचित माझ्या आवाजाचा जादू असेल किंवा माझ्या कथा सांगण्यातच एक वेगळेपणा होता ज्यामुळे लहानपणीच माझ्या करिअरचे एक स्थान निर्माण झाले. आयुष्यात बरेच अनुभव, अ‍ॅडव्हेंचर, प्रसिद्ध चित्रपट, पर्यटन यांच्यामुळे माझी अनेक मोठमोठया व्यक्तींशी भेट होत होती. मला एका व्यक्तीने सहज विचारले की, तुम्ही एक पुस्तक का लिहित नाही? एके दिवशी माझे परममित्र चिफ जस्टीस तिरथ ठाकूर यांच्यासोबत मी रात्रीचे जेवण घेत होतो तेव्हा ते म्हणाले,‘तुमची आयुष्याची कहानी खरंच खूप प्रेरित करणारी आहे. ती विसरून जाण्यापूर्वी कुठेतरी लिहून ठेवायला हवी. मग मी मनात निश्चित केले. 

* ‘बेस्ट मिस्टेक आॅफ माय लाइफ’ हेच नाव का निश्चित केले?
- ‘बेस्ट मिस्टेक’ चा अर्थ असा आहे की, मी आयुष्यात अनेक संधी घालवल्या. माझ्यासमोर अनेक चांगल्या संधी होत्या, ज्यामुळे मला खूप फायदा झाला असता. मात्र, मी आयुष्यात काय कमावले आणि काय सोडले हे सगळं या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे. मी हे पुस्तक लिहिताना पुन्हा एकदा माझे आयुष्य जगले आहे.

* कलाकारांचे आयुष्य हे एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे असते, तुम्ही या गोष्टीला मानता का?
- नाही, मी मानत नाही. कारण कलाकार पण एक व्यक्ती असतो. तुम्हाला माहिती नाही की, त्या व्यक्तीने किती स्ट्रगल केले आहे? त्याच्या आणि त्याच्या घरच्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी आहेत याबाबत तुम्हाला माहित नसते. मी कधीही विचार केला नव्हता की, मी माझ्या आयुष्यात इतके पुढे पाऊल ठेवेल. 

 * हृतिक रोशन यांनी तुमच्या पुस्तकाचे कव्हर सोशल मीडियावर लाँच केले आहे. कसे वाटतेय?
- सोशल मीडियावर जेव्हा हृतिकने माझ्या पुस्तकाचे कव्हर लाँच केले तेव्हा मला खरंच खूप आश्चर्य वाटले. हृतिक माझा जावई आहे. माझ्या मुलीसोबत त्याचा घटस्फोट झाला असेल तरीही तो माझ्या नातवंडांचा वडील आहे.  मी त्याच्यावर माझ्या मुलाप्रमाणे प्रेम करतो. मला माझ्या पुस्तकावर खूप अभिमान आहे.

*  फिरोज खान यांच्यामुळे तुम्ही किती प्रेरित झाला आहात? तुम्ही चित्रपटांमध्ये येण्याचे किती श्रेय त्यांना देता?
- मी जेव्हा ११ वर्षांचा होतो तेव्हा मी ‘आवारा’ चित्रपट पाहिला होता. तो चित्रपट पाहिल्यानंतर मग मी इंडस्ट्रीत काम करण्यास सुरूवात केली. राज कपूर यांना मी माझे आदर्श मानतो. फिरोज खान यांना इंजिनियर बनायचे असल्याने त्यांना जर्मनीला जायचे होते, त्यांना अभिनयक्षेत्रात रस नव्हता. आमच्या एका मित्राने फिरोज खान यांना अभिनयाच्या अशा काही गोष्टी सांगितल्या की, तू इंजिनियरिंग विसरून जाशील. मग त्यांनी या क्षेत्राचा विचार केला.

* नवे चित्रपट तुम्ही पाहता का? कोणते कलाकार आवडतात?
- रणबीर कपूरचा ‘संजू’ चित्रपट मी पाहिला. तो मला लंडनमध्ये भेटला तेव्हा मी त्याला भेटलो. त्याचे कौतुक केले. हृतिक रोशन देखील खूप चांगला कलाकार आहे.

* चित्रपटांचे रिमेक बनवले जात आहेत. काय सांगाल?
-  चित्रपटांच्या रिमेकविषयी हेच सांगेल की, काही गोष्टींना हात लावायला नको. त्या जशा आहेत त्या तशाच चांगल्या वाटतात.

* चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा काही विचार?
- जायेद खान याच्यासोबत मिळून एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मात्र त्याबद्दल आताच काही बोलू शकत नाही.          

Web Title: Do not spoil classic artwork by remake '- Veteran actor Sanjay Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.