Adipurush: सैफ, प्रभासने घेतलं तगडं मानधन, पण देवदत्त नागेने मात्र...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 02:28 PM2023-05-10T14:28:29+5:302023-05-10T14:29:47+5:30
Devdutt nage: प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत जवळचा म्हणून हनुमानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे देवदत्त नागेच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे.
प्रसिद्ध मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याच्या 'आदिपुरुष' (adipurush) या सिनेमाची सध्या प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे. अलिकडेच या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे या सिनेमाविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच सध्या या सिनेमासाठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं याची चर्चा रंगू लागली आहे.
'आदिपुरुष' या सिनेमामध्ये प्रभास आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे या सिनेमासाठी देवदत्त नागे याने नेमकं किती मानधन घेतलं हा प्रश्न त्याच्या मराठी चाहत्यांना पडला आहे.
प्रभास -
या सिनेमामध्ये प्रभास (PRABHAS) प्रभू रामचंद्राची भूमिका साकारत आहे. ही मुख्य भूमिका असल्यामुळे त्याने यासाठी तब्बल १५० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
क्रिती सेनॉन -
या सिनेमाच्या माध्यमातून क्रिती पहिल्यांदाच प्रभाससोबत काम करतीये. यात ती सीतेची भूमिका साकारत आहे. त्यामुळे तिने यासाठी ३ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
सैफ अली खान-
नायकासह खलनायिकी भूमिकाही उत्तमरित्या साकारणारा सैफ अली खान (saif ali khan) या सिनेमात रावणाची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याने १२ कोटी रुपये फी घेतली आहे.
सनी सिंग -
प्यार का पंचनामा या सिनेमामध्ये झळकलेला सनी सिंग आदिपुरुषमध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारत आहे. यासाठी त्याला दीड कोटी रुपये मानधन देण्यात आलं आहे.
सोनल चौहान-
अभिनेत्री सोनल चौहान या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून तिला ५० लाख रुपये मानधन मिळालं आहे.
देवदत्त नागे -
मराठीतील लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे (devdutt nage) या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारत आहे. प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत जवळचा म्हणून हनुमानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे देवदत्त नागेच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे. मात्र, या सिनेमासाठी त्याने नेमकं किती मानधन घेतलं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.परंतु, काही सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने ६ कोटींपेक्षा जास्त मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.