श्रेया घोषाल एका गाण्यासाठी किती मानधन घेते माहितीये? जाणून घ्या 'मेलोडी क्विन'च्या संपत्तीबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 03:01 PM2024-04-14T15:01:50+5:302024-04-14T15:02:17+5:30

सुमधुर गळा लाभलेली श्रेया 'मेलोडी क्वीन' म्हणून देखील प्रसिद्ध आहे.

Do you know how much Shreya Ghoshal charges for a song? Know about Melody Quinn's wealth | श्रेया घोषाल एका गाण्यासाठी किती मानधन घेते माहितीये? जाणून घ्या 'मेलोडी क्विन'च्या संपत्तीबाबत

श्रेया घोषाल एका गाण्यासाठी किती मानधन घेते माहितीये? जाणून घ्या 'मेलोडी क्विन'च्या संपत्तीबाबत

श्रेया घोषाल (Shreya Ghoshal) ही एक बॉलिवूडची आघाडीची अन् प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे. सुमधुर गळा लाभलेली श्रेया 'मेलोडी क्वीन' म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आपल्या सुमधूर गायिकिने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेयाची जगभर ख्याती आहे. तिच्या सुरेल गायकिने श्रेयाने असंख्य चाहत्यांच्या मनं जिंकली आहेत. आपल्या गायकीद्वारे श्रेया आजही चिकार पैसे कमावते. अनेकांना असा प्रश्न पडत असेल की, एका गाण्यासाठी 'मेलोडी क्वीन' किती मानधन घेते. तर जाणून घेऊयात श्रेयाच्या एकूण संपत्तीबाबत...

बॉलिवूड सिनेमामधील गाण्यांना जादुई आवाज देण्यासाठी श्रेया घोषाल हिला पहिली पसंती असते. केवळ हिंदीच नाही तर श्रेया बंगाली, तेलगू, मराठी यासह इतर प्रादेशिक भाषांमध्येही गाणी गाते. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे 1984 साली जन्मलेली श्रेया घोषाल अतिशय आलिशान जीवनशैली जगते.  श्रेयाची बहुतेक कमाई लाइव्ह शो आणि चित्रपटांमधून येते. श्रेया विविध माध्यामतून दरमहा एक कोटी रुपये कमावते. 


 
न्यूज18 च्या ताज्या अहवालानुसार, श्रेया घोषाल ही प्रत्येक गाण्यासाठी 25 लाख रुपये मानधन घेते.  गेल्या काही वर्षात श्रेयाच्या संपत्तीमध्ये बरीच वाढ झाली आहे. तिची एकूण संपत्ती ही 180-185 कोटी आहे.  एवढचं नाही तर श्रेया घोषालकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. तिच्याकडे मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत कोटींमध्ये आहेत.

श्रेयाने आतापर्यंत एक हजाराहून अधिक बॉलिवूड गाणी गायली आहेत. यामध्ये 'डोला रे डोला', 'सिलसिला ये चाहत का', 'चिकनी चमेली', 'तेरी मेरी', 'तेरे लिए' यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.  श्रेया घोषाल हिला अमेरिकेतील ओहायो राज्याकडून सन्मानित करण्यात आलं. याशिवाय ओहायोचे राज्यपाल टेड स्ट्रिकलँड यांनी २६ जून २०१० हा दिवस 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून घोषित केला. राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

Web Title: Do you know how much Shreya Ghoshal charges for a song? Know about Melody Quinn's wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.