ना आर्यन खान, ना टायगर! हा अभिनेता आहे बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत स्टारकिड, ३००० कोटींची आहे संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 14:30 IST2024-10-25T14:30:00+5:302024-10-25T14:30:00+5:30
वडील सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक असतानादेखील या स्टारकिडने अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. हा स्टारकिड म्हणजे आर्यन खान किंवा टायगर श्रॉफ नव्हे तर...

ना आर्यन खान, ना टायगर! हा अभिनेता आहे बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत स्टारकिड, ३००० कोटींची आहे संपत्ती
बॉलिवूडमधील स्टारकिड हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. स्टारकिडचे लाइफस्टाइल जाणून घेण्याबाबत चाहतेही उत्सुक असतात. बॉलिवूडमधील अशाच एका स्टारकिडचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याचे केवळ देशातच नाही तर जगभरातही चाहते आहेत. वडील सुप्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक असतानादेखील या स्टारकिडने अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. हा स्टारकिड म्हणजे आर्यन खान किंवा टायगर श्रॉफ नव्हे तर हृतिक रोशन आहे.
हृतिकने २००० साली कहो ना प्यार है या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमाने हृतिकला स्टार केलं. तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या हृतिकने कभी खुशी कभी गम, में प्रेम की दिवानी हूं, आप मुझे अच्छे लगने लगे, ना तुम जानो ना हम अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर अग्नीपथ, क्रिश, धूम, कोई मिल गया, जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमांमधून त्याच्या अभिनयाचे पैलू दिसले. जोधा अकबर, मोहनजोदारो या सिनेमांमध्ये हृतिकने ऐतिहासिक भूमिका साकारल्या.
बॉलिवूडमधील करिअरबरोबरच हृतिक एक यशस्वी उद्योजकदेखील आहे. २०१३ साली त्याने HRX नावाचा कपड्याचा ब्रँड सुरू केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या कंपनीची किंमत सुमारे १००० कोटींच्या घरात आहे. एवढंच नव्हे तर हृतिक रोशन एकूण ३१०० कोटींचा मालक आहे. पण, हृतिक रोशन सगळ्यात श्रीमंत स्टारकिड असला तरी तो बॉलिवूडमधला सगळ्यात श्रीमंत अभिनेता नाही. शाहरुख खान बॉलिवूडमधील सगळ्यात श्रीमंत अभिनेता आहे. त्याची एकूण संपत्ती ७३०० कोटींच्या घरात आहे.