करिना कपूरची मावशीच्या वाट्याला आले होते हालाखीचे जगणं, घरच्यांच्या विरोधात जात 16 व्या वर्षीच केलं होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 05:15 PM2021-09-02T17:15:41+5:302021-09-02T17:27:07+5:30
निर्माता सशाधर मुखर्जी यांनाही त्यांचा मुलगा जॉय मुखर्जी लाँच करायचे होते. यासाठी ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. एका मासिकात साधनाचा फोटो पाहून त्यांनी साधना यांना लव्ह इन शिमला चित्रपटासाठी साइन केले होते.
ज्येष्ठ अभिनेत्री साधना आज असल्या तर त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा झाला असता.त्यांचा जन्म 2 सप्टेंबर 1941 रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये झाला होता. साधना शिवदासानी ६० ते ७० काळा आपल्या अभिनय आणि सौंदर्याने गाजवला होता. बर्याच लोकांना माहित नाही की साधना या करीना कपूर आणि करिश्मा कपूरची चुलत मावशी आहे. करीनाची आई बबिता आणि साधना चुलत बहिणी. साधना सुपरस्टार बनण्यामागे निर्माता सशाधर मुखर्जी यांचा हात होता. लव्ह इन शिमला चित्रपटाने साधनाला रातोरात स्टार बनवले होते.
या चित्रपटात साधना यांची हेअरस्टाईलसुद्धा त्यांच्या नावाने प्रसिद्ध झाली आणि आजही लोकप्रिय आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या साधना यांचे फार मोठे फिल्मी करिअर नव्हते. लहान वयातच लग्न करत त्या सिनेसृष्टीपासून दूर झाल्या होत्या. एकेकाळच्या लोकप्रिय अभिनेत्री असणाऱ्या साधना अखेरच्या काळात कोणाच्याच लक्षात राहिल्या नाहीत.अखेरच्या काळात हलाखीचं जगणंच त्यांच्या वाट्याला आले. मुंबईतील एका जुन्या बंगल्यात भाड्याने त्या राहत होत्या. हा बंगला आशा भोसले यांचा होता. त्यांच्या पडत्या काळात कोणीच त्यांच्या मदतीलाही पुढे आले नव्हते. अखेर 25 डिसेंबर 2015 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
खूप कमी लोकांना माहित आहे की साधना यांनी बालकलाकार म्हणून देखील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1955 मध्ये राज कपूर यांच्या श्री 420 मध्ये त्या झळकल्या होत्या. चित्रपटाच्या एका गाण्यात नर्गिसच्या मागे ग्रुप डान्स त्यांनी केला होता. 1958 मध्ये, साधना यांना पहिला चित्रपट (सिंधी) आबानासाठी साइन केले गेले. या चित्रपटासाठी त्यांना फक्त एक रुपया मानधन स्वरुपात देण्यात आले होते. तरीही त्यांनी या चित्रपटात काम केले होते.
त्यावेळी निर्माता सशाधर मुखर्जी यांनाही त्यांचा मुलगा जॉय मुखर्जी लाँच करायचे होते. यासाठी ते नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. एका मासिकात साधनाचा फोटो पाहून त्यांनी साधना यांना लव्ह इन शिमला चित्रपटासाठी साइन केले होते.त्या काळात साधना यांची प्रत्येक गोष्ट एक ट्रेंड बनत होती. त्यांनी त्यांच्या काळात चुडीदार सलवारची फॅशनही प्रसिद्ध केली होती.
साधना यांनी तिच्या लव्ह इन सिमला चित्रपटाचे दिग्दर्शक राम कृष्ण नय्यर यांच्याशी लग्न केले. चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली. लग्नाच्या वेळी साधना केवळ 16 वर्षांच्या होत्या आणि नय्यर 22 वर्षांचे होते. साधना यांनी कुटुंबाच्या विरोधात जात हे लग्न केले होते. राज कपूर यांनीच साधना यांना त्यांच्या लग्नासाठी मदत केली होती. साधना यांचे पती नय्यर यांचे 1995 मध्ये निधन झाले. दोघांनाही मुलं बाळ नव्हते. पतीच्या मृत्यूनंतर साधना पूर्णपणे एकाकी पडल्या होत्या. नैराश्यात राहू लागल्या होत्या. यामुळे अनेक आजारांनीहीत्या ग्रस्त होत्या.