राय लक्ष्मी आणि महेंद्रसिंग धोनीच्या अफेअरविषयी तुम्हाला माहिती आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 09:25 AM2017-09-06T09:25:21+5:302017-09-06T14:55:21+5:30

‘आगामी जुली-२’ हा चित्रपट विविध कारणांनी चर्चेत आहे. त्यातीलच एक कारण म्हणजे बोल्ड राय लक्ष्मीचे माहीसोबत असलेले अफेअर हे होय, मात्र त्यांच्या अफेअरमधील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?

Do you know of the opinion of Roy Laxmi and Mahendra Singh Dhoni? | राय लक्ष्मी आणि महेंद्रसिंग धोनीच्या अफेअरविषयी तुम्हाला माहिती आहे काय?

राय लक्ष्मी आणि महेंद्रसिंग धोनीच्या अफेअरविषयी तुम्हाला माहिती आहे काय?

googlenewsNext
०० सालात आलेल्या नेहा धूपिया स्टारर ‘जुली’चा दुसरा भाग पुन्हा एकदा चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे. होय, आम्ही ‘जुली-२’विषयी बोलत असून, त्याचा ट्रेलर रिलीज होण्याच्या तयारीत आहे. पहिल्या भागात नेहा धूपियाने तिच्या बोल्ड अदा दाखवित चाहत्यांना घायाळ केले होते. आता ‘जुली-२’मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री बोल्डनेसच्या सर्व सीमा पार करीत सिनेमागृहात आग लावणार आहे. वास्तविक हा चित्रपट सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. पहिले आणि सर्वात मजेशीर कारण म्हणजे या चित्रपटाच्या डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी माजी सेन्सॉर बोर्ड अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यावर असून, त्यांनी या चित्रपटाला फॅमिली चित्रपट म्हणून संबोधले आहे. दुसरे कारण म्हणजे या चित्रपटातून साउथ अभिनेत्री राय लक्ष्मी बॉलिवूड डेब्यू करीत आहे. तर तिसरे कारण प्रेक्षकांना माहिती नसून, त्याचा उलगडा आम्ही करणार आहोत. 

होय, दीपक शिवदासिनी दिग्दर्शित या चित्रपटाची अभिनेत्री राय लक्ष्मी सर्वात अगोदर तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा तिचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्याशी जोडले गेले होते. त्यावेळी अशी चर्चा रंगली होती की, राय लक्ष्मीचे धोनीबरोबर अफेअर असून, ती नेहमीच त्याच्यासोबत वेळ व्यतित करीत असते. काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लक्ष्मीने म्हटले होते की, ‘एवढा काळ गेला, परंतु जेव्हा धोनीचा उल्लेख केला जातो तेव्हा त्याच्या नावाशी माझे नाव जोडले जाते, आजही आमच्यातील रोमान्सच्या चर्चा रंगविल्या जातात. परंतु या चर्चा मला त्रस्त करतात. आता तर मला हे कळून चुकले माझे धोनीसोबतचे नाते एखाद्या घट्ट डागाप्रमाणे आहे, जो एवढ्या सहजासहजी जाणार नाही.’



त्यावेळी राय लक्ष्मीने हेदेखील सांगितले होते की, ‘मी त्याला खूप चांगले ओळखते. परंतु हे मी सांगू शकत नाही की, यास कोणत्या तरी नात्याचे नाव द्यायला हवे. आम्ही आजही एकमेकांचा आदर करतो. तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे. त्यामुळे आमची कथा केव्हाच संपली आहे.’ राय लक्ष्मीचा हा खुलासा खूपच धक्कादायक ठरला होता. त्यावेळी धोनी आणि तिच्यातील अफेअरच्या चर्चा त्याकाळी चांगल्या रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा ‘जुली-२’मुळे ती चर्चेत आली आहे. त्याचबरोबर माहीसोबतच्या चर्चाही माध्यमांमध्ये रंगविल्या जात आहेत. दरम्यान, राय लक्ष्मीने ‘जुली-२’मध्ये बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या असून, तिचा हा चित्रपट चित्रपटगृहात आग लावेल, यात शंका नाही. 

Web Title: Do you know of the opinion of Roy Laxmi and Mahendra Singh Dhoni?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.