"हे माझं खरं नाव नाही", नावाबाबत प्रीती झिंटाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं नाव..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 04:34 PM2023-12-14T16:34:13+5:302023-12-14T16:35:54+5:30
प्रीती झिंटाचं खरं नाव काय आहे? अभिनेत्रीने स्वत:च केलेला खुलासा, म्हणाली, "माझं नाव..."
बॉलिवूडची डिंपल क्वीन प्रीती झिंटा चर्चेत आली आहे. १९९८ साली 'दिल से' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या प्रीतीने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यानंतर 'कोई मिल गया', 'वीर झारा', 'कल हो ना हो', 'दिल है तुम्हारा', 'सोल्जर', 'सलाम नमस्ते' अशा सुपरहिट चित्रपटांत प्रीती दिसली. अनेक बॉलिवूड कलाकारांनी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नावात बदल केले आहेत. त्यामुळेच प्रीती झिंटानेही बॉलिवूडमध्ये आल्यानंतर नाव बदलल्याची चर्चा रंगली होती.
प्रीती झिंटा हे अभिनेत्रीचं खरं नाव नसून तिचं नाव प्रीती सिंह असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर खुद्द प्रीती झिंटानेच भाष्य करत खुलासा केला आहे. प्रीतीने तिच्या एक्स अकाऊंटवरुन एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये तिने तिच्या खऱ्या नावाबाबत खुलासा केला आहे. "सोशल मीडियावर काही आर्टिकल आणि विकिपिडियावरही माझं नाव प्रीती झिंटा नसून प्रीतम सिंह झिंटा असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. मी तु्म्हाला सांगू इच्छिते की माझं नाव कधीच प्रीतम सिंह झिंटा नव्हतं. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हाही माझं नाव प्रीती झिंटा होतं आणि आजही तेच आहे," असं प्रीतीने व्हिडिओत म्हटलं आहे.
आज जब मैंने एक मीडिया आर्टिकल में पढ़ा की मेरा असली नाम प्रीतम सिंह ज़िंटा है तो मुझसे रहा नहीं गया । में आपसे यह कहना चाहती हूँ की यह फेक न्यूज़ है। सच तो यह है की हमारी फ़िल्म “सोल्जर” के सेट पर बॉबी डियोल मुझे मज़ाक़ से प्रीतम सिंह बुलाते थे। फ़िल्म हिट हो गये, हमारी दोस्ती… pic.twitter.com/M3CFSHAmuj
— Preity G Zinta (@realpreityzinta) December 14, 2023
"लग्नानंतर माझं नाव Priety G Zinta झालं. माझ्या नवऱ्याचं नाव गुडनफ आहे. पण मी ते पूर्ण न लावता फक्त G लावते. मला सांगायचं आहे की प्रीतम सिंह झिंटा माझं नाव कधीच नव्हतं. मला नेहमी लोक विचारतात की तू नाव बदललं आहेस का? तर मी त्यांना सांगू इच्छिते की माझं नाव प्रीती झिंटा होतं, आहे आणि राहील", असंही तिने व्हिडिओत म्हटलं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने प्रीतम सिंह झिंटाच्या नावामागची स्टोरीही सांगितली आहे. "सोल्जर सिनेमाच्या सेटवर बॉबी देओल मला मस्तीमध्ये प्रीतम सिंह म्हणून हाक मारायचा. त्यानंतर चित्रपट हिट झाला, आमची मैत्री वाढली आणि हे नावही माझ्यावर चिकटून गेलं. तेव्हापासून मी लोकांना सांगून सांगून थकले की माझं नाव प्रीती झिंटा आहे," असं प्रीतीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
प्रीती झिंटाने २०१६ साली जेने गुडनफ यांच्याशी विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. तिला दोन जुळी मुले आहेत. प्रीतीच्या मुलांची नावे जिया आणि जय अशी आहेत. प्रीती सध्या तिच्या कुटुंबाबरोबर अमेरिकेत असते.