कोट्यावधी कमावणारा सलमानही कधी काळी अभिनेत्रीमुळे झाला होता बेरोजगार, पाच महिने होता कामाच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:51 PM2021-12-29T17:51:44+5:302021-12-29T17:52:39+5:30
Maine Pyar Kiya राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 28 कोटींची कमाई केली होती.
सलमान खान (Salman Khan) आणि भाग्यश्री(Bhagyashree) ‘मैंने प्यार किया’(Miane Pyar Kiya) सिनेमाने या दोघांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. या सिनेमाच्या रिलीजला ३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा सिनेमा २९ डिसेंबर १९८९ रोजी प्रदर्शित झाला होता. आणि त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. राजश्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 2 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 28 कोटींची कमाई केली होती.
मुळात 'मैने प्यार किया'साठी सूरज बडजात्याची पहिली पसंती सलमान खान नव्हता हे फार कमी लोकांना माहीत आहे.पियुष मिश्रीला मुख्य अभिनेता म्हणून घ्यायचे होते, परंतु ते काही कारणामुळे शक्य झाले नाही. यानंतर त्याने फराज खानला सिनेमाची ऑफर दिली आणि त्याने होकार दिला. पण शूटिंगपूर्वी आजारी पडल्यामुळे पुन्हा एकदा अभिनेत्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी काहींनी सलीम खानचा मुलगा सलमान खानचे नाव सुचवले. त्या काळात सलमानही सिनेमात कामाच्या शोधात होता आणि सूरज बडजात्याने(Sooraj Barjatya) सलमानला साइन केले.
सलमान खान आणि भाग्यश्री या दोघांचा लीड म्हणून हा पहिलाच सिनेमा होता. विशेष म्हणजे पहिला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खानकडे चार ते पाच महिने अजिबात काम नव्हते. काही महिने सलमान बेरोजगारच होता. त्यासाठी सलमानने भाग्यश्रीलाच जबाबदार धरले होते.सलमान खानने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते - 'मैने प्यार किया' रिलीज झाल्यानंतर 4-5 महिने मला कोणतेही काम मिळाले नव्हते. भाग्यश्रीने लग्न करून अभिनयक्षेत्र सोडण्याच्या निर्णयामुळे मला कोणतेही काम मिळत नसावे असे वाटत होते. कारण त्यावेळी सगळ्यांनाच वाटत होतं की भाग्यश्रीमुळेच 'मैने प्या किया' सिनेमा सुपरहिट झाला. भा
भाग्यश्रीने सिनेमात काम करणं सोडल्यानंतर कोणीच मला काम देणार नसल्याचे वाटु लागले होते. सलमान खान पुढे म्हणाला की,कमा मिळवण्यासाठी त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनी हस्तक्षेप केला आणि दिग्दर्शक जीपी सिप्पी यांना सांगितले की त्यांनी सलमानला एका प्रोजेक्टसाठी साइन करावे.जेव्हा एका व्यावसायिक मासिकात ही घोषणा केली गेली तेव्हा दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माझ्याकडे सिनेमांच्या ऑफर आणल्या आणि त्यापैकी एक रमेश तौरानी (Ramesh Taurani) होते.