अदा शर्मा नव्हे 'हे' आहे अभिनेत्रीचं खरं नाव; तुम्हाला माहितीये का 'द केरळ स्टोरी'च्या शालिनी उन्नीकृष्णनचं रिअल नेम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 02:27 PM2023-05-12T14:27:04+5:302023-05-12T14:28:49+5:30

Adah sharma: 'द केरळ स्टोरी' प्रदर्शित झाल्यापासून अदा सातत्याने चर्चेत येत आहे. यात तिच्या प्रॉपर्टी, लाइफस्टाइलची चर्चा होतीये. इतकंच नाही तर आता तिच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे.

do you know the real name of the kerala story lead actress adah sharma | अदा शर्मा नव्हे 'हे' आहे अभिनेत्रीचं खरं नाव; तुम्हाला माहितीये का 'द केरळ स्टोरी'च्या शालिनी उन्नीकृष्णनचं रिअल नेम

अदा शर्मा नव्हे 'हे' आहे अभिनेत्रीचं खरं नाव; तुम्हाला माहितीये का 'द केरळ स्टोरी'च्या शालिनी उन्नीकृष्णनचं रिअल नेम

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (adah sharma)  सध्या द केरळ स्टोरी या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारुन ती सध्या प्रकाशझोतात आली आहे. २००८ साली विक्रम भट्ट यांच्या '1920' या सिनेमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर ती काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकली. परंतु, तिला खरी ओळख द केरळ स्टोरीमुळे मिळतीये असं म्हणायला हरकत नाही. सध्या सोशल मीडियावर अदाच्या नावाची चर्चा होताना दिसतीये.

'द केरळ स्टोरी' प्रदर्शित झाल्यापासून अदा सातत्याने चर्चेत येत आहे. यात तिच्या प्रॉपर्टी, लाइफस्टाइलची चर्चा होतीये. इतकंच नाही तर आता तिच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. या अभिनेत्रीचं खरं नाव अदा नसून दुसरंच आहे. एका मुलाखतीत तिने तिचं खरं नाव सांगितलं आहे.

अदाने द केरळ स्टोरी प्रदर्शित होण्यापूर्वी पावनी मेहरोत्रा यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली होती. ज्यात तिने तिच्या खऱ्या नावाविषयी भाष्य केलं. 'तुला अदा हे नाव कसं पडलं?' असा प्रश्न अदाला विचारण्यात आला. त्यावर, 'माझं खरं नाव चामुंडेश्वरी अय्यर असं आहे. पण, हे नाव उच्चारणं खूप कठीण आहे. त्यामुळे मग मी अदा नाव लावण्यास सुरुवात केली', असं अदाने सांगितलं.

दरम्यान, 'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदाने शालिनी उन्नीकृष्णन ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. अदाने तिच्या फिल्मी करिअरमध्ये हिंदीसह तेलुगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
 

Web Title: do you know the real name of the kerala story lead actress adah sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.